Jump to content

जाते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पारंपारिक जाते

जात्याचा इतिहास

[संपादन]

सनपूर्व दोन हजार वर्षापासून जाते प्रचारात असावे, असे मानण्यास आधार आहे. सिंधुसंस्कृतीशी समकालीन आणि समान असलेल्या लोथलमधील उत्खननात जाते (वरची तळी) सापडली आहेत. तशाच तऱ्हेची तळी असलेली जाती नेवासे, तडकोड, वडगाव व सिरपूर तेथील उत्खननात मिळाली आहेत. नागार्जुन आणि तक्षशिला येथील उत्खननात जाती सापडली आहेत.नेवासे येथील उत्खननात तर अनेक जाती सापडल्या आहेत.[] पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी आपल्या कुटुंब जीवनात जात्याला महत्त्वाचे स्थान होते. आजही खेड्यात पहाटेच्या प्रहरी जात्याची घरघर आवाज येतो, आणि त्या घरघरीबरोबरच दळणाऱ्या स्त्रीच्या मुखातून स्त्र्वणाऱ्या अमृतमधुर ओव्याही ऐकायला मिळतात. गाण्याने श्रम हलके होतात, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणतात.या ओव्या अनेक अनामिका स्त्रियांनी सहजपणे रचलेल्या असतात. त्यांत स्त्रीहृद्यातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त झालेले दिसतात.एखादी जबाबदारी स्वीकारली,कि ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येते, हा भाव व्यक्त करण्यासाठी ‘जात्यावर बसल्यावर ओवी सुचते,’ अशी म्हण मराठीत प्रचारात आलेली आहे. जात्यावरच्या ओव्यातून जात्याविषयी कृतज्ञता अनेक प्रकारे व्यक्त झालेली आहे. जात्याला ईश्वर मानून एक लोक कवयित्री गाते –
जात्या तू ईश्वरा | तुंझ जेवण मला ठांव | घास घालिते मनोभाव ||
थोरल मांझ जात | खुंटा त्याचा चकमकी | आम्ही दळू या मायलेकी ||
थोरल मांझ जात | चवघी बायकांचं | घर वडील नायकांच ||

गीताच्या छंदात दळण सरत आल्यावर मराठी स्त्री आपल्या भक्तीसंपन्न भावनेच्या स्पर्शाने ओलावलेली एखादी ओवी म्हणून असा उपसंहार करते. पूर्वी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती.तेंव्हा ग्रामीण भागातील स्त्रिया सकाळी भल्या पाहटे जात्यावर धान्य दळत असत. आधुनिक काळात जात्याची जागा विजेवर चालणाऱ्या गिरणी(चक्की)ने जात्याची जागा घेतली आहे.तरी आजही ग्रामीण भागात "जाते" वापरले जाते व लोकप्रिय आहे.जात्यावर कडधान्य ही भरडले जातात.[ संदर्भ हवा ]

स्वरूप

[संपादन]

धान्य जात्यात दळून त्याचे बारीक पीठ करतात. जाते आकाराने वर्तुळाकार गोल असते. जाते दगडाचे असून त्यामध्ये दोन तळ्या असतात.खालची तळी ही स्थिर असते.वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटा असतो.हा खुंटा हाती धरून वरची तळी फिरविता येते.या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रातून थोडे थोडे धान्य टाकतात.आणि दोन्ही तळ्याच्या घर्षणामुळे त्या धान्याचे पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते. जाते घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवले जाते. पूर्वीच्या स्त्रिया जात्यावर धान्य दळत असताना गाणी म्हणत, त्याला जात्यावरची ओवी असे म्हणत.

उखळी सारखे जाते

[संपादन]

हे गोल आकाराचे असुन खाली निमुळते आहे.वरच्या तळीच्या बाजु किंचित अर्धगोल असुन,तिचा खालचा भाग खोलगट आहे.वरच्या बाजुला खुंटा बसवण्यासाठी भोक पाडलेले आहे.धान्य घालण्यासाठी वरच्या तळीला जे तोंड असते.नेवासे येथील उत्खननात या प्रकारची अनेक जाती सापडली आहेत

उखळीचे जाते

ग़ोंडांचे मातीचे जाते

[संपादन]

वरची तळी बरीच उंच असते.खालच्या तळीच्या उंच पृष्ठ्भागावर तो चांगला बसतो.हि भुमीया जमातीत वापरली जाणारी मातीची जाती आहेत.

जात्यावरच्या ओव्या

[संपादन]

प्राचीन मराठी वाङ्मयात संतानी जात्यावर व दळणाच्या क्रियेवर रचलेली अनेक परमार्थक रूपके आढळतात. इ.स.च्या सतराव्या शतकातील प्रसिद्ध संत केशवस्वामी यांचे हे पारमार्थिक दळण पाह्ण्यायोगे आहे:

येई वो कान्हाई हात लावी बाई |
दळण दळितां पाही सोसलीचे ||
तूं माझी माऊली विश्रातींची छाया |
होई दळावाया साहे मज ||
कृपयोगे हात लावी कृष्णमाय |
तेणें व्देत पाहे वळीयलें ||
ज्ञाता-ज्ञान तळी विज्ञान खुंटा बळो |
अधिष्ठान मुळी कृष्ण माझा ||
संसाराचे बीज दळियलें सहज |
साहे झालो मज कृष्णमाय ||
कृष्णासंगे आम्ही सर्व दळीयलें |
अखंड उरलें कृष्णरूप ||
गुरुकृपे केशवी दळण पूर्ण झालें |
पुर्णी पूर्ण उरलें कृष्णरूप ||

भारतातील अनेक प्रादेशिक भाषांत जात्याविषयी आणि जात्यांवर म्हणायची गीते आढळतात. चार मुलीनी हात धरून जात्याप्रमाने गोल फिरण्याचा एक खेळ महाराष्ट्रात प्रचलित आहे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा