जांभळा कोह्काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जांभळा कोह्काळाला इंग्रजी भाषेमध्ये ‘Eastern Purple Heron’ असे म्हणतात.मराठीमध्ये त्यास जांभळा कोह्काळ,जांभळा ढोक,जांभळा बगळा तर सिंधुदुर्ग इथे त्यास मोठा ढोक .तर हिंदी मध्ये त्यास अंजन,नरी,निरगोंग,लाल अंजन,लाल सैन म्हणतात.तसेच संस्कृत मध्ये निलाड्ःग,नलारुण बक,पूर्वीय नीलारुण बक गुजराती भाषेमध्ये त्यास नडी आणि तेलगु भाषेमध्ये येर्र नारायण पक्षि,पमुल नारीगाडू तर तमिळमध्ये चिन्नारै असे म्हणतात.

American Purple Gallinule walking

जांभळा कोह्काळाला ओळखणे खूप सोप्प नाही. तो राखी कोहकाळापेक्षा लहान आणि सडपातळ आहे.जांभळा कोहकाळाचे नर व मादी असे दोन प्रकार आहेत.दोघांलाही ओळखने खूप सोप्प नाही कारण ते दोघेही सारखेच दिसतात त्यांचा रंग,रूप,आकार,इ.सारखेच असते.त्या दोघांचा रंग जांभळा,निळा अथवा जांभळसर काळा असतो त्यांची पंख व शेपटी काळसर रंगाची असते.मध्याचा व तुऱ्याचा रंग राखी काळा असतो.त्यांच्या तांबूस मानेवर काळ्या रेघा असतात .त्यांची हनुवटी व कंठ हे पांढऱ्या रंगाचे असतात.त्यांच्या छातीवरच्या बदामी क्लाबुती पिसांवर तांबूस काड्या असतात व इतर भाग हा पांढऱ्या वर्णाचा असतो.

American Purple Gallinule in water

हा पक्षी साधारणतः भारतातील मैदानी प्रदेशात,श्रीलंका,अंदमान आणि निकोबार बेटे,इ. भागात आढळतो .तो निवासी स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे तो उत्तर भारतात जून ते ऑक्टोबर,तसेच दक्षिण भारत आणि श्रीलंकेमध्ये नोव्हेंबर ते मार्च या काळात दिसतो. तो जास्तीत-जास्त दलदली,सरोवरे,खाजणी आणि भात शेते असलेल्या भागात निवास करतो व हि सगळी ठीकाने त्याची निवासस्थाने म्हणून ओळखली जातात.

संदर्भ[संपादन]

पुस्तकाचे नाव:पक्षीकोश

लेखकाचे नाव:मारुती चितमपल्ली