Jump to content

जय जवान जय किसान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाल बहादूर शास्त्री

जय जवान जय किसान ही भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची एक घोषणा आहे, जी त्यांनी १९६५ मध्ये उरुवा, प्रयागराज येथे एका सार्वजनिक मेळाव्यात दिली होती. [] []

जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर शास्त्रींनी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर लगेचच भारतावर पाकिस्तानने हल्ला केला. त्याचवेळी देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा देत सैनिकांना भारताच्या रक्षणासाठी उत्तेजित केले आणि त्याच बरोबर आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. ही एक अतिशय लोकप्रिय घोषणा बनली. [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "The ground beneath her feet". Livemint. April 5, 2014. 2014-04-05 रोजी पाहिले.
  2. ^ "State to usher in 'Jai Jawan, Jai Kisan' era". द हिंदू. Dec 9, 2006. December 11, 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 October 2012 रोजी पाहिले.