जयराम पिंड्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयराम पिंड्ये हा १७ व्या शतकातील कवी होता. ह्याच्या वडिलांचे नाव गंभीरराव असून हे निजामशाहीच्या काळात नाशिक परिसरातील मार्कंडा , अहिवंतगड, इंद्राई अश्या सात किल्ल्यांचे प्रमुख होते. जयराम पिंड्ये कर्नाटकात गेला व शाहजी राजेंनी व पुढे एकोजी राजेंनी त्याला आश्रय दिला. त्याला बारा भाषाची येत असे. जयराम पिंड्येचे राधामाधवविलासचंपूपर्णालपर्वतग्रहणाख्यानम् हे दोन ग्रंथ ज्ञात आहेत.

जयराम पिंड्ये लिखित ग्रंथ[संपादन]

राधामाधवविलासचंपू - हे जयराम पिंड्ये लिखित संस्कृत गद्य पद्य ग्रंथ असून ह्यात एकूण अकरा प्रकरणे आहेत. पहिल्या पाच प्रकरणांमधे राधा व माधव ह्यांच्या शृंगाराचे वर्णन असून इतर प्रकरणांमध्ये शाहजी राजांची प्रशंसा केलेली आहे. ह्या ग्रंथातील दहा प्रकरणे संस्कृत मधे व अकरावे प्रकरण बरेचसे हिंदी, काही मराठी,फार्सी, गुजराती इत्यादी भाषांमधे आहे.

राधामाधवविलासचंपू ह्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत वि.का.राजवाडे ह्यांना पुणे जवळील चिंचवड येथे मिळाली. शाहजी राजांच्या जीवनाचे परिक्षण करून व पाठाचा मराठी सारांश देऊन राजवाडेंनी हा ग्रंथ प्रकाशित केला.

पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् - जयराम पिंड्ये याने लिहिलेल्या ह्या संस्कृत काव्यात पाच अध्यायांमध्ये एकूण ३५४ श्लोक आहेत. शिवाजी राजांच्या सैन्याचा पन्हाळा किल्ल्यावरील विजय (इ.स.१६७३) व सेनापती प्रतापराव गुजरआदिलशाही सरदार बहलूलखान यांची लढाई हा ह्या संस्कृत काव्याचा विषय आहे. जयराम पिंड्ये ह्या काव्यातील हकीकत शिवाजी राजांचे भाऊ एकोजी राजे ह्यांना सांगत आहे अशी काव्याटी मांडणी केलेली आहे.

स.म.दिवेकर ह्यांना ह्या काव्याची हस्तलिखित प्रत तंजावरला मिळाली व ह्या काव्याचा संस्कृत पाठ मराठी अनुवादासह त्यांनी प्रकाशित केला.