Jump to content

स.म. दिवेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स.म.दिवेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
सदाशिव महादेव दिवेकर
सदाशिव महादेव दिवेकर

सदाशिव महादेव दिवेकर हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी कवींद्र परमानंद लिखित श्रीशिवभारत या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्त्वाचे साधन आहे. दिवेकर पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते. दिवेकर मुळचे कल्याण येथील कापडाचे व्यापारी होते. कल्याण येथे त्यांची एक कापड गिरणी व पेढी होती.

या शिवाय जयराम पिंड्ये लिखित पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या ग्रंथालाही त्यांनी प्रसिद्धी दिली. वि.का.राजवाडे यांना महिकावतीची बखर अभ्यासासाठी उपलब्ध करून देणारेही दिवेकरच होते.

स.म.दिवेकर यांची पुस्तके

[संपादन]
  • कविन्द्र परमानन्दकृत श्रीशिवभारत (प्रकाशक - स.म.दिवेकर)
  • जयराम कवि विरचित पर्णालपर्वतग्रहणाख्यान (प्रकाशक - स.म.दिवेकर)
  • आपटे, द.वि.; दिवेकर, स.म. (१९२५). शिवचरित्र प्रदीप. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.