जयधवला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुणधरकृत कषायप्राभृत ह्या दिगंबर जैन सिद्धांतग्रंथावर वीरसेन व जिनसेन (नववेशतक) ह्या गुरुशिष्यांनी ६०,००० गाथांत लिहिलेली संस्कृत-प्राकृत मिश्रित टीका. ह्या ग्रंथाच्या पहिल्या २०,००० गाथा लिहून झाल्यावर वीरसेन निधन पावला. त्यानंतर ४०,००० गाथा लिहून जिनसेनानेही टीका पूर्णकेली. ह्या टीकेत कषायप्राभृतावर ⇨ यतिवृषभाने  लिहिलेली चूर्णिसूत्र, उच्चारण आणि बप्पदेव ह्यांनी लिहिलेली उच्चारणवृत्ति  इ. टीकांचा अंतर्भावकेला आहे. दिगंबर जैन तत्त्वज्ञानावरील गोम्मटसार  वगैरे प्रख्यात जयधवलेच्या आधारे लिहिण्यात आले आहेत.