जगन्नाथ वाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


डॉ. जगन्नाथ वाणी (जन्म : नाशिक, १० सप्तेंबर, इ.स. १९३४; - कॅलगरी-कॅनडा, ५ मे, इ.स. २०१७) हे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (SAA) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.

जगन्नाथ वाणी यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई केवळ १४ वर्षांची होती. त्यांना स्वतःच्या वयाच्या दहाव्या वर्षी, आणखी तीन लहान भावंडे होती. प्राथमिक शाळेत, इयत्ता तिसरीत शिकत असतांना कुटुंबीयांच्या काही मित्रमंडळींनी जगन्नाथाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्या काळात, वाणी परिवारात आणि त्यांच्या सभोवतालच्या समाजात बालविवाह सर्रास चालत. सुदैवाने जगन्नाथ वाणींच्या वडिलांनी अशा प्रथेस खंबीरपणे विरोध केला आणि मुलांच्या शिक्षणावर भर दिला.

१९५४ साली मुंबई बोर्डात मॅट्रिक परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांमधे मराठी, कानडी, गुजराथी असे विद्यार्थी असत. त्या वर्षींच्या शालान्त परीक्षेत मुंबई इलाख्यातून एक लाख विद्यार्थ्यांतून उत्तीर्ण झालेल्यांमधे पहिल्या १५ क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत १४ विद्यार्थी कानडी व गुजराती भाषक होते. एकमेव मराठी भाषक नांव ९व्या क्रमांकावर असलेल्या जगन्नाथ वाणींचे होते.

शालान्त परीक्षेतील भरघोस यशानंतरही नातलग व गावकऱ्यांमार्फत जगन्नाथ वाणींच्या लग्नासाठी अधूनमधून प्रस्ताव येत होतेच. परंतु त्यांच्या शाळेतील शिक्षकांनीच ही लगीनघाई रोखली. १९५५-१९५९ या कालावधीत वाणी फर्ग्युसन महाविद्यालय व पुणे विद्यापीठातून बी.एस्‌सी. ऑनर्स झाले. त्यानंतर त्यांचे लग्न धुळे जिल्ह्यातील नामपूर गांवचे नरहर गोपाळशेट यांची कन्या कमलिनी (पूर्वाश्रमीची कृष्णा) हिच्याशी ३१मे १९५९मधे झाले. १९६०च्या एप्रिलमधे त्यांनी पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस्‌‌सी.ची पदवी संपादन केली.

नोकरीचे प्रयत्‍न[संपादन]

जगन्नाथ वाणी यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजे १९६० ते ६२ या दरम्यान धुळे जिल्ह्यातील शेतकी महाविद्यालयात गणित विषयांची अर्धवेळ प्राध्यापकी आणि खाजगी शिकवण्याही केल्या, पण मनासारखी नोकरी मिळेना. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्येही ते काही महिने होते, काही ठिकाणी वशिलेबाजी, अंतर्गत राजकारणही नोकरी मिळण्याच्या आणि नोकरी टिकण्याच्या मार्गात आड येई. अशा काळात राष्ट्र सेवादलातील शिबिरांच्या निमित्ताने भेटलेला मित्र जी.पी.पाटील कामी आला. तो त्यांच्या अगोदर, मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिल्या दहांत येऊन पुढे संख्याशास्त्र विषयात एम्‌.एस्‌‌सी. पदवी घेऊन कॅनडातील मॅकगिल विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता. त्याच्या मदतीने जगन्नाथ वाणींना त्याच विद्यापीठात गणितीय संख्याशास्त्र (मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स)मधे पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश व आर्थिक मदत मिळाली.

इ.स. १९६७मध्ये पीएच.डी. झाल्यावर जगन्नाथ वाणी पुढे कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि तेथूनच १९९५मध्ये निवृत्त झाले. त्या विद्यापीठात त्यांनी विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम, शिका व कमवा योजना, विविध शिष्यवृत्त्यांची निर्मिती, कॅलगरी विद्यापीठाचा पुणे विद्यापीठस्थित परदेश सत्र अभ्यासक्रम, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतातील पहिल्या विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या स्थापनेसाठी चालना, असे काही शैक्षणिक प्रकल्प सुरू केले होते.


डॉ. जगन्‍नाथ वाणी यांनी जनजागृतीसाठी निर्माण केलेले चित्रपट[संपादन]

  • एक कप चाय (माहिती अधिकाराच्या प्रचारासाठी)
  • डॉक्टर, बाळ बोलत नाही (जन्मतःच मूक-बधिर असलेल्या मुलांवर)
  • देवराई (स्किझोफ्रेनिया-मनोविदलतेच्या आजारावरील)

डॉ. जगन्नाथ वाणी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अंधारातील प्रकाशवाटा (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)
  • Probability and Statistical Inference
  • Triumphs and Tragedies (का.स. वाणी मेमोरियल ट्रस्ट प्रकाशन, धुळे)

पुरस्कार[संपादन]

  • कॅनडा सरकारचा ऑर्डर ऑफ कॅनडा हा पुरस्कार
  • इतर अनेक अन्य पुरस्कार