जगदंबिका माता मंदिर, केळापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

आंध्र महाराष्ट्राच्या सीमेपासून २० कि.मी. अंतरावर व पांढरकवडा या तालुक्याच्या ठीकाणापासून केवळ ४ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ७ या महत्त्वाच्या हैदराबाद - नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मॉ जगदंबेचे अति प्राचीन हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे. ही जगदंबा अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश व विदर्भातील दूरवरुन भाविक मोठ्या संखेने येथे दरवर्षी येत असतात. तरी वर्षानुवर्षे हे मंदिर उपेक्षीत होते.

१९८८ मध्ये श्री जगदंबा संस्थान केळापूर पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषीत करण्यात आले व संस्थान्चे परीसरांत अनेक सावलीच्या व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून मंदिर परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुरवरून येणार्या भाविकांसाठी भक्त निवास / मंगलकार्यालय, मुलांसाठी बाल उद्यान आदिंच्या सोयी केल्या आहेत.

२ ऑक्टो १९८२ रोजी म. शिवाजीराव मोघे उपमंत्री म. रा. यांचे शुभहस्ते, श्री. अण्णासाहेब पारवेकर यांचे अध्यक्षतेखाली, श्री. संत ईस्तारी महाराज (किन्ही) यांचे प्रमुख उपस्थितीत व घाटंजी, पांढरकवडा य दोन्ही तालुक्यातील अनेक भाविक नागरिकांचे उपस्थितीत माँ. जगदंबेच्या प्रेरणेने मंदीराचे जीर्णोध्दाराच्या भूमीपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. १९८२ ते १९८७ पर्यंत एकता मंडळ जीर्णोध्दार समीतीच्या वतीने भाविकांकडून सार्वजनिक रुपात वर्गणी गोळा करून जीर्णोध्दाराचे कार्य करण्यात आले. समीतीने या कामावर साडे चार लक्ष रु. खर्च केला.

डॉ. या. मा. काळे लिखित "वऱ्हाडचा इतिहास" या पुस्तकामध्ये केळापुरच्या देवीचा उल्लेख केला आहे. "केळापूर - पांढरकवडा ही गावे जवळ जवळ आहे. केळापूरात देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे. केळापूरात एकाच शिळेस चारही बाजूस गणपतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे येथे किल्ला आहे. यास कुंतलपूर हे जुने नाव असून प्राचीन चंद्रहास राजाने नगर अशी आख्यायीका आहे. इ.स. १८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा पळत असता येथे ऍडम्स व स्मिथ या ब्रिटीश सरदरांशी त्याचे सैन्याने लढा दिला. पण त्यात बाजीरावाचे सैन्याचा पराभव होऊन त्यास उत्तरेकडे पळावे लागले व अप्पासाहेब भोसल्यांना जाउन मिळण्याचा त्याचा बेत फसला."

देवगीरीचा राजा रामदेवराव यावे दरबारात हेमाद्रीपंत नावाचा प्रधान होता. तो वास्तूशिल्पज्ञ होता. त्याचेच काळात हेमाडपंथी मंदीराची बांधणीची पद्धत सुरु झाली. त्यानुसार हे मंदिर १४ व्या शतकातील असावे असे वाटते. प्राचीन इतिहासाचा संदर्भ लक्षात घेता येथील देवीचे मंदिर पांडवकालीन असावे असे वाटते. धर्मराजाने अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला शामकर्ण नावाचा अश्व कुंतलपूरात चंद्रहास राजाने अडविला असा उल्लेख कवी श्रीधर रचित ’जैमिनी अश्वमेध’ या ग्रंथात अध्याय ५१ ते ६१ मध्ये आढळतो. केळापूर येथील देवीमंदीरात परंपरेने गोंधळ करणारे गोंधळी कुंतलपूर चा राजा चंद्रहास, राजकुमारी विषया, यांचा इतिहास पोवाड्याद्वारे आजही सांगतात तेव्हा पौराणिक कालीन कुंतलापूर ते आजचे केळापूर होय याबाबत शंका वाटत नाही.