Jump to content

जगजीतसिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जगजीत सिंह या पानावरून पुनर्निर्देशित)
Jagjit Singh (es); Jagjit Singh (ast); Джагджит Сингх (ru); Jagjit Singh (cy); Jagjit Singh (sq); جګجيت سنګهـ (ps); جگجیت سنگھ (pnb); جگجیت سنگھ (ur); Jagjit Singh (rm); جاجيت سينج (arz); zakir hussen (si); जगजीत सिंहः (sa); जगजीत सिंह (hi); జగ్జీత్ సింగ్ (te); ਜਗਜੀਤ ਸਿੰਘ (pa); জগজিৎ সিং (as); ஜக்ஜீத் சிங் (ta); जगजीत सिंह (bho); জগজিৎ সিং (bn); Jagjit Singh (fr); जगजीतसिंह (mr); Jagjit Singh (nb); ଜଗଜୀତ ସିଂହ (or); Jagjit Singh (pt); जगजीत सिंह (ne); Jagjit Singh (en-gb); Jagjit Singh (de); Jagjit Singh (sl); ಜಗಜಿತ್ ಸಿಂಗ್ (kn); Jagjit Singh (pt-br); جگجیت سینگ (fa); जगजीत सिंह (mai); Jagjit Singh (ga); ജഗ്ജീത് സിങ് (ml); Jagjit Singh (nl); जगजीत सिंह (dty); جقجیت سینق (azb); جگجيت سنگهه (sd); Jagjit Singh (ca); Jagjit Singh (en); جاجيت سينغ (ar); Jagjit Singh (it); Jagjit Singh (fi) ভারতীয় সংগীত শিল্পী (bn); Indiase musici en zangers (nl); penyanyi asal India (id); cyfansoddwr a aned yn 1941 (cy); indischer Musiker und Sänger (de); ureueng meujangeun asai India (ace); Indian Ghazal singer, songwriter and musician (en-gb); भारतीय ग़ज़ल गायक (1941-2011) (hi); భారతీయ గజల్ గాయకుడు.. (te); भारतीय गझल गायक (mr); Indian Ghazal singer (1941–2011) (en); مغني غزل هندي (ar); غزل کے گلوکار، نغمہ نگار اور موسیقار (ur); panyanyi (mad) Jagmohan Singh Dhiman (rm); ജഗ്ജിത് സിങ്, ജഗജിത് സിംഗ്, Jagjit Singh (ml); Джагмохан Сингх Дхиман (ru); जगजित सिंह, जगजीत सिंह (mr); జగజీత్ సింగ్ (te); Jagmohan Singh (en-gb); Jagjit Singh, Jugjit Singh (as); جګجيت سېنګهـ, جګجيت سنګ (ps); Jagmohan Singh Dhiman (en); जगजीत सिंह (sa)
जगजीतसिंह 
भारतीय गझल गायक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखफेब्रुवारी ८, इ.स. १९४१
गंगानगर
मृत्यू तारीखऑक्टोबर १०, इ.स. २०११
मुंबई
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
  • cerebral hemorrhage
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९६०
नागरिकत्व
निवासस्थान
शिक्षण घेतलेली संस्था
  • Kurukshetra University (postgraduate education)
व्यवसाय
वैवाहिक जोडीदार
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जगजीतसिंह (पंजाबी: ਜਗਜੀਤ ਸਿੰਘ ; हिंदी: जगजीत सिंह ; रोमन लिपी: Jagjit Singh ) (८ फेब्रुवारी, इ.स. १९४१; श्रीगंगानगर, बिकानेर संस्थान - १० ऑक्टोबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे ख्यातनाम भारतीय गझलगायक, संगीतकार होते. इ.स. १९७० आणि इ.स. १९८० च्या दशकात गायिका पत्‍नी चित्रा सिंह यांच्यासमवेत जगजीत यांनी केलेल्या गझलांच्या संगीत ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांना गझलसम्राट या नावाने ओळखले जाऊ लागले. पंजाबी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी या भाषांमधून जगजीतसिंह यांनी गायन केले. त्यांना भारतीय केंद्रशासनाने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले.

जगजीत सिंह यांच्या गाजलेल्या गझला

[संपादन]
  • कोई पास आया सवेरे सवेरे । मुझे आज़माया सवेरे सवेरे (राग ललत)
  • तुम इतना जो मुस्करा रहें हो
  • प्यार मुझ से जो किया तूने
  • होटों से छू लो तुम

जीवनकहाणी

[संपादन]

जगजीतसिंह यांचा जन्म राजस्थानमधील श्री गंगानगर येथे झाला. [] शीख परिवारात जन्मलेले जगजीतसिंह यांच्या वडिलांचे नाव सरदार अमरसिंह धिमान असे होते. ते सरकारी खात्यात सर्वेअर म्हणून रोपर जिल्ह्यातील डल्ला येथे नोकरीला होते. जगजीतसिंह यांच्या आईचे नाव बच्चन कौर असे होते. त्या गृहिणी होत्या. नामधारी परिवारातील बच्चन कौर लुधियानातील ओट्टालन गावातील रहिवासी होत्या. जगजीतसिंह यांचे शालेय शिक्षण खालसा हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण सरकारी महाविद्यालयात झाले. मात्र, त्यांनी कला शाखेतील पदवी जालंधरमधील डीएव्ही महाविद्यालयातून घेतली. ऑल इंडिया रेडिओच्या जालंधर स्टेशनवर त्यांनी गायन केले. येथूनच त्यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी हरयाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांची संगीत क्षेत्रातील रुची पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना पंडित छगनलाल शर्मा आणि त्यानंतर उस्ताद जमाल खान यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिक्षणासाठी पाठवले. तेथेच ते ख्याल, ध्रुपद, ठुमरीसह अनेक रागदारीचे शिक्षण घेतले. असे असले तरी त्यांच्या वडिलांना वाटायचे, की जगजितने इंजिनीअर व्हावे. मध्यमवर्गीय परिवाराच्या साधारणपणे अशाच अपेक्षा होत्या. जगजीतसिंह यांच्या भावंडांनी त्यांच्या संगीतकलेला प्रोत्साहन दिले. मार्च १९६५ मध्ये जगजितसिंग यांनी कोणालाही न सांगता घर सोडले [] आणि मुंबईच्या मायानगरीत आले. मुंबईत त्यांना अनेक संधी मिळाल्या. जिंगल गायनापासून त्यांचा संगीत कलेत प्रवेश झाला.

रुख़ से परदा उठा दे ज़रा साक़िया

बस अभी रंग-ए-महफ़िल बदल जायेगा

हे गीत ते महाविद्यालयीन स्तरावर सादर करायचे. त्याला भरभरून दाद मिळाली. पुढे त्यांचे मित्र त्यांना भेटले तर या गीताची हमखास फर्माईश करायचे.

1966 मध्ये जगजीतसिंह यांना एचएमव्ही कंपनीचे आमंत्रण मिळाले. त्यांनी त्यांच्या गझलांचे ईपी काढले. या ईपीत जगजीतसिंह यांच्या दोन गझलांचा समावेश होता. या ईपीवर जगजितसिंग यांचा एक फोटो हवा होता. त्या वेळी जगजीतसिंह यांचे रूपडे पंजाबी थाटात होते. दाढी, पगडी अशा पेहरावात गायक शोभत नाही, असे त्याला सांगितले. त्यामुळे त्यांनी पगडी आणि दाढी काढून पूर्ण सफाचट झाले. वडील रागावतील म्हणून त्यांनी अनेक दिवस त्यांना सांगितले नाही, पण मोठ्या भावाला चिठ्ठी लिहून सांगितले, की मी आता शीखरूपात तुम्हाला दिसणार नाही. लोक शीख रूपात गायकाला स्वीकारत नाहीत. त्यामुळे आता मी कायमस्वरूपी मुंबईतच राहणार आहे. [] मुंबईत जगजीतसिंह यांची ओळख चित्रा यांच्याशी झाली. त्या जिंगल गायन करायच्या. सुरुवातीला त्यांना जगजीतसिंह यांचा आवाज अजिबात आवडला नव्हता. [] ६०-७० च्या दशकात वर्णभेदामुळे आफ्रिका वेगळा पडला होता. भारत सरकारनेही आफ्रिकेशी संबंध ठेवले नव्हते. अशातच जगजीतसिंह यांचा आफ्रिकेत गझलगायनाचा कार्यक्रम झाला. त्यामुळे त्यांच्या गझलांवर भारताने बंदी घातली होती. मोठ्या कालावधीनंतर ही बंदी हटविण्यात आली. [] जगजीतसिंह यांचा ‘अनफॉरगेटेबल्स’ हा अल्बम प्रचंड गाजला होता. त्या वेळी ते लंडनमध्ये होते. सहा महिन्यांनी ते मायदेशी भारतात परतले तेव्हा त्यांना कळले, की आपल्या ‘अनफॉरगेटेबल्स’ने प्रचंड धूम केली आहे. त्यांचे गझल गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी देशभर चढाओढ असायची. अशातच त्यांच्याशी एचएमव्ही कंपनीने ८० हजारांचा करार केला. ७० च्या दशकात ८० हजार रुपये छोटी रक्कम नव्हती. []

जगजीतसिंह यांनी घटस्फोटित चित्रा यांच्याशी लग्न केले होते. चित्रा यांना पहिल्या पतीपासून मोनिका नावाची एक मुलगी होती. लग्नानंतर या दाम्पत्याला मुलगा झाला. त्याचे नाव विवेक. मात्र, ऐन तारुण्यात त्यांचा 18 वर्षांचा मुलगा विवेकचा अपघातात मृत्यू झाला. हा आघात जगजितसिंग आणि चित्रा यांच्या सहनशक्तीपलीकडचा होता. कारण विवेक अशा ठिकाणी गेला, जिथून तो परत कधीच येणार नव्हता. चित्रा यांनी तर गायनच सोडले. []

जगजीतसिंह 70 व्या वाढदिवसानिमित्त संगीतप्रेमींना खास भेट देणार होते. पुन्हा नव्या कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यांनी ठरवलं, की 70 व्या वाढदिवसानिमित्त संगीतप्रेमींसाठी वर्षभरात 70 कार्यक्रम सादर करायचे. जगजीतसिंह यांचं मन तरुण होतं. पण वय साथ देत नव्हतं. वर्षभरात 70 कार्यक्रम म्हणजे महिन्याला किमान सहा कार्यक्रम. पण नियतीला हे मान्य नव्हतं. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. []

जगजीतसिंह यांच्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठीत त्यांच्या जीवनकहाणीवर ‘मेरा गीत अमर कर दो’ हे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार महेश पठाडे लिखित साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Pathade, Mahesh. "Jagmohan to Jagjit singh (part 1) : फाटलेली तिकिटे जोडून जगजितसिंग पाहायचे सिनेमा". Kheliyad. 2020-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ Pathade, Mahesh. "Jagmohan to Jagjit singh (part 2) ः ट्रेनच्या शौचालयात बसून प्रवास..." Kheliyad. 2020-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ Pathade, Mahesh. "Jagmohan to Jagjit singh (part 3) : कुणासाठी त्यांनी पगडी-दाढीपासून मुक्ती घेतली?". Kheliyad. 2020-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ Pathade, Mahesh. "Jagmohan to Jagjit singh (part 4) : असा मिळाला जगजितसिंग यांना पहिला ब्रेक!". Kheliyad. 2020-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ Pathade, Mahesh. "Jagmohan to Jagjit singh (part 5) : भारत सरकारने घातली होती जगजितसिंग यांच्या गझलांवर बंदी!". Kheliyad. 2020-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ Pathade, Mahesh. "Jagmohan to Jagjit singh (part 6) : जगजितसिंग यांना 70 च्या दशकात मिळाली होती 80 हजारांची रॉयल्टी". Kheliyad. 2020-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ Pathade, Mahesh. "Jagmohan to Jagjit singh (part 7) : या आघाताने जगजितसिंग कोलमडले, चित्रा निःशब्द झाल्या..." Kheliyad. 2020-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  8. ^ Pathade, Mahesh. "Jagmohan to Jagjit singh (part 8) : जगजितसिंग यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले..." Kheliyad. 2020-04-08 रोजी पाहिले.[permanent dead link]