Jump to content

छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कानपूर विद्यापीठ उत्तर प्रदेशातील एक विद्यापीठ. कानपूर ह्या ठिकाणी  १९६६ मध्ये स्थापन झाले. याच्या कक्षेत अलाहाबाद आणि लखनौ येथील विद्यापीठांस संलग्न असलेली महाविद्यालये वगळता, फतेपुर, कानपूर, इटावा, फरूखाबाद, झांशी, जालौन, हमिदपूर, लखनौ, बांदा, बाराबंकी, उनाओ, रायबरेली, सीतापूर व लखीमपूर-खेरी येथील महाविद्यालयांचा समावेश होता. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक व परीक्षक मंडळाप्रमाणे असून सु.७३ महाविद्यालये त्यास संलग्न केलेली असून दोन घटक महाविद्यालयेही आहेत. अद्यापि ह्या विद्यापीठात सर्व विषयांच्या शाखोपशाखा नाहीत तथापि वाणिज्य, विधी व काही भौतिक शास्त्रे या विषयांत शाखा सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाच्या संविधानानुसार कुलगुरू व कुलसचिव विद्यापीठाची सर्व प्रशासकीय व्यवस्था पाहतात. कुलगुरू सर्वोच्च अधिकारी असून कुलगुरुपद सवेतन आहे. विद्यापीठाचे माध्यम इंग्रजी आहे. १९७१-७२ मध्ये विद्यापीठात सु. १,२९,९२१ विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठाचे उत्पन्न १९७१-७२ मध्ये ३४.४८ लाख रू. होते व खर्च ४६.३९ लाख रू. होता.