छत्रपती दुसरे राजारामराजे भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


छत्रपती राजारामराजे भोसले (दुसरा राजाराम)
छत्रपती
Rajaram II.jpg
छत्रपती दुसरे राजाराम भोसले यांचे अस्सल चित्र
Flag of the Maratha Empire.svg
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ इ.स. १८६६ - इ.स. १८७०
राज्यव्याप्ती कोल्हापूर संस्थान पर्यंत
राजधानी कोल्हापूर
पूर्ण नाव छत्रपती राजारामराजे भोसले
जन्म इ.स. १३ एप्रिल १८५०
कोल्हापूर
मृत्यू इ.स. ३० नोव्हेंबर १८७०
पूर्वाधिकारी छत्रपती पाचवे शिवाजीराजे भोसले (पाचवा शिवाजी)
उत्तराधिकारी छत्रपती सहावे शिवाजीराजे भोसले
राजघराणे भोसले


छत्रपती दुसरे राजाराम (13 एप्रिल 1850 - 30 नोव्हेंबर 1870), 18 ऑगस्ट 1866 ते 30 नोव्हेंबर 1870 पर्यंत कोल्हापूर संस्थानचे राजा होते. तिसऱ्या शिवाजींना औरस पुत्र नसल्याने पाटणकरांकडील मुलगा दत्तक घेतला. तोच राजाराम होय. हा मोठा देखणा, शहाणा आणि त्या काळातील नवलाई म्हणजे हा इंग्रजी बोलणारा होता. राजाराम महाराजांची यूरोप-यात्रा फार गाजली. त्यांचे कौतुकही पुष्कळ झाले. परत येताना फ्लॉरेन्स (इटली) या शहरात ते मरण पावले (१८७०). त्यांची छत्री तेथे आहे. इटलीतील मंत्र्यांच्या परवानगीने अरव नदीच्या काठावरच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यामागे शिवाजी सहावा गादीवर आला.