चोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लंडन येथे इ.स. १८७२ साली भरलेल्या लंडन जागतिक प्रदर्शनामध्ये साडी व चोळी लेऊन बसलेली मॉडेल स्त्री

चोळी हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला व सहसा साडीसोबत ल्यायला जाणारा स्त्रियांच्या पोशाखातील प्रकारविशेष आहे. चोळी स्त्रीच्या स्तनांना व सहसा पाठीच्या वरच्या भागासही झाकेल, परंतु पोट व पाठीचा मध्यभाग अनावृत राहतील, अश्या पद्धतीने बेतलेली असते. हातांतून घालण्यासाठी हिला बाह्या शिवण्यात येतात.

स्थानपरत्वे प्रकारविशेष[संपादन]

महाराष्ट्रीय पद्धतीची चोळी[संपादन]

मराठी समाजात लहान मुलींनी परकर-चोळी घालायची रीत होती [१]. बायका नऊवारी साडीसोबत कोपरपर्यंत बाह्या असलेली, रोमन लिपीतील व्ही अक्षरासारखा गळा असलेली व स्तनांच्या मधोमध गाठ मारण्याजोगी खणाची चोळी घालत [१].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b गोरे,रेखा. ""पदरावरती जरतारीचा" - साडी-चोळी पेहरण्याच्य पारंपरिक पद्धतींविषयी माहिती". Archived from the original on 2016-03-11. ७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत