चोलुतेका नदी
Appearance
चोलुतेका नदी होन्डुरासमधील एक नदी आहे. ही नदी फ्रांसिस्को मोराझान प्रांतातील लेपातेरिके गावाजवळ उगम पावते व तेथून उत्तरेस तेगुसिगाल्पा शहरातून वाहते. त्यानंतर ही नदी दक्षिणेस वळते व एल परैसो प्रांतानंतर चोलुतेका प्रांतातील चोलुतेका शहरातून वाहत फोन्सेकाच्या आखातास मिळते.