चोलुतेका, चोलुतेका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

चोलुतेका होन्डुरासच्या याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर चोलुतेका नदीकिनारी वसलेले असून पॅन अमेरिकन महामार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे. अंदाजे एक लाख वस्ती असलेल्या या शहरात मोठे बस स्थानक असन तेथून मोठ्या संख्येने प्रवासी होन्डुरास तसेच शेजारी देशांत प्रवास करतात.

या शहराच्या ठिकाणी इ.स. १५४५ पासून वस्ती आहे. तेव्हा त्यास व्हिया दि हेरेझ दि चोलुतेका असे नाव होते. इ.स. १८४५मध्ये यास शहराचा दर्जा देण्यात आला.