चिखल्या बाड्डा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चिखल्या बाड्डा
चिखल्या बाड्डा


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.चिखल्या बाड्डा किंवा पूणाडू (इंग्लिश:Garganey, Bluewinged Teal; हिंदी : खीरा, खीड, चेतवा, चैता, चैती, पटारी; संस्कृत : क्षुद्र हंस, साचि हंसक, हंस साचि; गुजराती : चेतवा; कन्नड : नीलि रेक्केय चरले,नीलि रेक्केय दासगोरे) हा एक पक्षी आहे.

या पक्ष्याचे नर आणि मादी हे दोघेही बदकापेक्षा लहान असतात. नराचे डोके गुलाबी उदी रंगाचे असते त्यावर पांढऱ्या रंगाच्या काड्या असतात त्याचा भुवया ठळक पांढऱ्या रंगाच्या असून त्याचे पंख आणि खांदे हे निळसर करड्या रंगाचे असतात. मादी दिसायला खूप सुंदर बटव्याच्या मादी सारखी असते, तिच्या रंगात पिवळसर झाक असते. पंखावर पुसट पट्टे असतात. ते सुंदर बटव्याच्या पट्ट्यांइतके ठळक नसतात. जवळून पहिले असता गळा शुभ्र पांढरा दिसतो. मादीला ठळक भुवया असतात.

Blue-winged Teal

हा पक्षी हिवाळ्यामध्ये हिवाळी पाहुणा म्हणून भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतो. तसेच तो पॅलिआर्क्टिक प्रदेशातही आढळतो. दलदलीचा भाग,सरोवरे आणि समुद्रकिनारे ही त्याची राहण्याची ठिकाणे असतात.

ओळख[संपादन]

Blue-winged Teal (8457152262)
Blue-winged Teal (13813806594)

संदर्भ[संपादन]