चिक्कदेवराज वडियार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिक्कदेवराज वोडेयार
मैसुरुचा १४वा राजा
अधिकारकाळ १६७३-१७०४
अधिकारारोहण १६७३
राज्याभिषेक १६७३
राजधानी मैसुरु
जन्म २२ सप्टेंबर, १६४५
मृत्यू १६ नोव्हेंबर, १७०४
पूर्वाधिकारी दोड्डा केम्पदेवराज वोडेयार
' दुसरा कांतीरव नरसराज
उत्तराधिकारी दुसरा कांतीरव नरसराज
संतती दुसरा कांतीरव नरसराज
राजघराणे वडियार घराणे
धर्म हिंदू

चिक्कदेवराज वडियार हा सध्याच्या भारतातील मैसूर संस्थानचा १४वा राजा होता.

१६८१ च्या उत्तरार्धात मोगलांचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजांनी हरजीराजे महाडिक या मातब्बर मराठी सरदारास २०००० सेना घेऊन दक्षिणेकडे रवाना केले. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय याने वरकरणी मराठ्यांशी मैत्री दाखवून आतून बादशाहाशी संधान बांधले. दक्षिणेकडे ३२० किलोमीटर धडक मारून मदुरा ताब्यात घेतले. त्यामुळे तंजावर व पश्चिमेकडील त्रिचनापल्ली आणि पूर्वेकडील नेगापट्ट ही मराठी स्थानके धोक्यात आली. चिक्कदेवराय व मोगल यांची युती मोडून काढणे आवश्यक असल्यामुळे तीस हजाराचे घोडदल बरोबर घेऊन संभाजीराजे स्वतः सातारा, मिरज, हुबळी, धारवाड या मार्गाने मैसूर कडे रवाना झाले. म्हैसूरवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चिक्कदेवरायचा शत्रू मादुरेचा नायक याच्याशी लष्करी करार करून व तंजावरच्या एकोजी राजांच्या तुकड्या घेऊन १६८३ च्या जानेवारीत संभाजी राजांनी म्हैसूरच्या पूर्वेस धर्मपुरी येथे आपली छावणी प्रस्थापित केली. ऑक्टोबर ८३ मध्ये संभाजी राजांनी त्रिचनापल्ली कडे जाऊन मदुरेचा कब्जा घेतला. व तेथून पूर्वेकडे वळून मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम व पोर्टोनोब्से येथे मराठी अंमल बसविला. या आक्रमक हालचालींमुळे चिक्कदेवरायाने मराठ्यांशी तहाची बोलणी सुरू केली. मराठ्यांनी एक कोटी होनांची खंडणी घेऊन त्यांच्याशी शस्त्रसंधी केली. या सर्व गोष्टींमुळे मसुरकर चिक्कदेवराय याचे चांगलेच धाबे दणाणले. यानंतर लगेच मध्य महाराष्ट्रात होणाऱ्या मोगली आक्रमणाला थोपविण्यासाठी राजे रायगडला परतले.