Jump to content

चार्ल्स कॉर्नवॉलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स कॉर्नवॉलिस, कॉर्नवॉलिसचा पहिला मार्केस (३१ डिसेंबर, इ.स. १७३८ - ५ ऑक्टोबर, इ.स. १८०५) हा ब्रिटिश लश्करी आणि वसाहती अधिकारी होता. अमेरिकन क्रांतीदरम्यान हा अमेरिकेतील ब्रिटिश सेनापती होता. यॉर्कटाउनच्या लढाईत याने हार झाल्यावर शरणागती पत्करली होती. यानंतर अमेरिकन क्रांती संपल्यातच जमा होती.

कॉर्नवॉलिसने भारत आणि आयर्लंडमध्येही लश्करी आणि मुलकी अधिकाऱ्याचे काम केले. तर भारतात कॉर्नवॉलिस कोड आणि पर्मनंट सेटलमेंट हे कायदे त्याने पारित केले.

इ.स. १७८१मध्ये कॉर्नवॉलिसला भारतात गव्हर्नर जनरल आणि सरसेनापती म्हणून पाठवले गेले. तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात याने ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करून टिपू सुलतानचा पराभव केला.

आयर्लंडमध्ये मुलकी अधिकारी असताना तेथे त्याने ॲक्ट ऑफ युनियन हा महत्त्वाचा कायदा पारित केला.