चार्ली मुंगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स थॉमस मुंगेर (१ जानेवारी १९२४ - २८ नोव्हेंबर, २०२३) हे अमेरिकन व्यापारी, गुंतवणूकदार आणि दानशूर होते. ते बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष होते, वॉरन बफे यांनी मुंगेरचे सर्वात आपला जवळचा भागीदार आणि उजवा हात असे वर्णन केले आहे. मुंगेर यांनी १९८४ ते २०११ पर्यंत वेस्को फायनान्शियल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया येथील डेली जर्नल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशनचे संचालक देखील होते.

संदर्भ[संपादन]