चर्चा:२०१० इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Untitled[संपादन]

या स्पर्धेचे नाव विशेषनाम हेच मुळी इंडियन प्रीमियर लिग असे आहे. भारतीय प्रिमीअर लिग असे नाव गोंधळात टाकू शकते. ते इंडियन प्रीमियर लीग किंवा खरेतर सरळ आय़पीएल ठेवणे योग्य होईल -मनोज ०१:१२, १२ मार्च २०१० (UTC)

याच्याशी काही अंशी सहमत. विशेषनामे सहसा भाषांतरित करू नये असा येथील शिरस्ता आहे. पण पूर्वी केलेली पाने पाहिल्यास भारतीय प्रिमीयर लीग नावही ठीक वाटते.
इतर सदस्यांचे मत जाणून घेउन बहुमताच्या कलाने लेखाचे शीर्षक असावे.
माझे मत -- भारतीय प्रिमीयर लीग
अभय नातू ०६:४८, १२ मार्च २०१० (UTC)
माझे मत -- भारतीय प्रिमीयर लीग
Maihudon ०६:५३, १२ मार्च २०१० (UTC)
माझ्या मते अशा मुद्द्यांचा निकाल बहुमताने लावू नये. कारण त्यातून बहुसंख्य सहभागितांचे मत असलेला पर्याय पुढे येईल. तो पर्याय सत्य आणि योग्य असेलच असे नाही. त्याऐवजी माहिती (फॅक्टस) आणि लॉजिकचा आधार घ्यावा. माझ्या माहितीनुसार इंडियन प्रीमियर लीग हे या स्पर्धेचे स्वामित्वहक्क योग्यरितीने प्रस्थापित झालेले ब्रॅंड नाव आहे. म्हणून विकीपीडियासारख्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर तेच वापरणे आपल्याला बंधनकारक असावे (किंवा बंधनकारक केलेही जाऊ शकते). माझे मत योग्य वाटत असेल तर संपूर्ण मराठी विकिपीडीयावर तसा बदल कुणीतरी पुढाकार घेऊन आताच करावा. इतर ब्रॅंडनेमबाबतही ही काळजी आपण आधीच घेणे चांगले, असेही सुचवावे वाटते. या माझ्या माहितीत-विचारात त्रुटी वाटत असतील तर त्या येथे स्पष्टपणे मांडणारांचे स्वागत आहे.
तरीही मतदान घ्यायचेच झाल्यास, माझे मत - इंडियन प्रीमियर लीग
मनोज ०७:३८, १२ मार्च २०१० (UTC)
माझे मत - इंडियन प्रीमियर लीग - कोल्हापुरी १०:२९, १२ मार्च २०१० (UTC)

ह्यात एका गोष्टीचा विरोधाभास आढळतो तो म्हणजे जर "इंडियन" चे "भारतीय" असे भाषांतरच करायचे होते तर मग उरलेल्या दोन शब्दांच्या बाबतीत तसा बदल का नाही केला गेला??
भारतीय प्रीमीअर लीग खूपच विचित्र नाव वाटते ऐकायला आणि लिहायला पण.
आणि सर्वात मोठा बदल म्हणजे प्रिमीअर असा मराठी शब्द आहे..हिंदीत प्रीमियर असे लिहितात.Prasannakumar ०८:५८, १२ मार्च २०१० (UTC)

प्रिमीयर हा शब्द येथे इंग्लिशमधील वापरलेला आहे व त्याचा उच्चार इंग्लिशमध्ये pri-meer (प्रि-मीयर/मियर) असा होतो.
डिक्शनरी.कॉम
माझ्या मते अशा मुद्द्यांचा निकाल बहुमताने लावू नये. कारण त्यातून बहुसंख्य सहभागितांचे मत असलेला पर्याय पुढे येईल. तो पर्याय सत्य आणि योग्य असेलच असे नाही. त्याऐवजी माहिती (फॅक्टस) आणि लॉजिकचा आधार घ्यावा.
लोकशाही संकल्पनेला छेद देणार्‍या या महाभागांचा निषेध असो. हाहा...अहो गंमत केली. तुमचे मत अगदी बरोबर आहे. जेव्हा दोन (जवळपास) समसमान पर्याय मांडले जातात तेव्हा बहुमत श्रेष्ठ ठरते. असो. दोन-तीन चांगली मते मांडली गेलीच आहेत. त्यांचे अन्वेषण करून योग्य तो मार्ग निवडावा.
अभय नातू १६:२६, १२ मार्च २०१० (UTC)