चर्चा:हेरॉल्ड-डोमर साचा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Modelला प्रतिशब्द प्रारूप आहे का?

अभय नातू १३:४२, ३० जून २०११ (UTC)

हो. महाराष्ट्र शासनाच्या बर्‍याच विकास आराखड्यांच्या संदभामध्येही मॉडेल या अर्थाने प्रारूप असा शब्द योजला जातो, असे आठवते. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:०७, ३० जून २०११ (UTC)

ऊप्स.. मात्र मराठीभाषा.कॉम/परिभाषाकोश या पानावर उपलब्ध असलेल्या शासनव्यवहारकोश, वाणिज्यकोशव्यवसाय व्यवस्थापन कोश या कोशांतील नोंदींनुसार मॉडेल याला प्रतिमान असा प्रतिशब्द वापरल्याचे दिसते. हे कोश महाराष्ट्र राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाकडून तज्ज्ञांकडून बनवून घेतले जात असल्याने, त्यातील शब्दांचा गांभीर्याने विचार (आणि झुकते माप देऊन वापरही) करायला हवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:१७, ३० जून २०११ (UTC)

मी सध्या तरी ह्याला "नमुना" (काहीसा विचित्र, म्हणजे चपखल बसत नसला तरी) हा शब्द वापरतो. पण अभय नातूंच्या म्हणण्याप्रमाणे प्रारूप योग्य वाटतोय. प्रतिमान जरा लांबलचक आणि बोजड वाटतोय. मराठीभाषा.कॉम/परिभाषाकोश ह्या दुव्यावरील कोशही मी वापरतो. परंतु त्यातील बरेच शब्द लांबलचक आणि बोजड आहेत उदा. भौतिकीतील mechanicsला यामिकी हा सुंदर शब्द असताना त्यांनी "स्थितीगतिशास्त्र" किंवा "स्थितीगतिकी" असा शब्दप्रयोग केला आहे आणि तो mechanicsचा विभाग असलेल्या statics आणि kinetics ची मराठी रुपे असून त्याचा जोडशब्द बनविल्याने तो लांबलचक बनला आहे. तथापि, मराठी विश्वकोश प्रमाणे ह्याला यामिकी (आणि विकिपीडियातसुद्धा बर्‍याचजणांनी बर्‍याच ठिकाणी ह्याचा प्रयोग केलेला आहे.) म्हटले आहे. अश्यावेळी आपल्या म्हणण्याप्रमाणे झुकते माप देऊ नये पण गांभीर्याने विचार जरूर करायला हवा. (माधुर्य, योग्य अर्थ, सुट्सुटीत/संक्षिप्तपणा आदींचा विचार करूनच) अनिरुद्ध परांजपे १५:५६, ३० जून २०११ (UTC)