चर्चा:स्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)
Appearance
This लेख is of interest to the following WikiProjects: | |
अचूक नाव
[संपादन]सदरील चित्रपटाचे पुढील पोस्टर इंग्रजी लेखात वापरलेले आहे. तसेच या चित्रपटाचे अधिकृत टिझर यूट्यूब वर देखील उपलब्ध आहे. या दोन अधिकृत पुराव्या नुसार चित्रपटाचे नाव 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नसून 'स्वातंत्र्य वीर सावरकर' असे आहे. सबब लेख नाव पूर्ववत करण्यात आले आहे.-संतोष गोरे ( 💬 ) १४:५५, १ एप्रिल २०२४ (IST)
- एकच शब्द हिंदी आणि मराठीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिहिला जातो. उदाहरणार्थ हिंदी भाषेमध्ये "भारत रत्न", "प्रधान मंत्री", "भगत सिंह", "चंद्र शेखर", "स्वातंत्र्य वीर", "राम नाथ कोविंद" असे शब्द लिहिले जातात. याच शब्दांना मराठीमध्ये अनुक्रमे "भारतरत्न", "प्रधानमंत्री", "भगतसिंग/भगतसिंह", "चंद्रशेखर", "स्वातंत्र्यवीर", "रामनाथ कोविंद" असे लिहिले जाते.
- सदर चित्रपटाचे नाव हिंदीमध्ये 'स्वातंत्र्य वीर सावरकर' असे आहे. पण मराठीमध्ये त्याला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' असे लिहिले जाईल. या कारणामुळे मी ते शीर्षक बदलले होते. --संदेश हिवाळेचर्चा १७:३५, १ एप्रिल २०२४ (IST)