चर्चा:स्तन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचा विस्तार करण्याचे काम मी आता सुरू केले आहे. याबद्दल कुणाच्या काही सूचना असतील तर त्या कृपया या पानावर द्याव्यात.

--Rajendra prabhune ११:०२, १२ फेब्रुवारी २०१८ (IST)

@Rajendra prabhune:
तुम्ही योगदान दिलेल्या इतर लेखांप्रमाणेच हा लेखसुद्धा माहितीपूर्ण असेल अशी खात्री आहे.
शुभेच्छा.
अभय नातू (चर्चा) ११:०४, १२ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

धन्यवाद. वेळोवेळी मार्गदर्शन करावे ही विनंती.

--Rajendra prabhune ११:११, १२ फेब्रुवारी २०१८ (IST)


@Rajendra prabhune: हे लेखात आपण इंग्लिश विकिपीडियाचे दुवे स्रोत म्हणून टाकले आहेत असे दिसते. कृपा नोंद घ्यावी विकिपीडिया विश्वसनीय स्रोत नाही. मला आशा आहे की आपण विकिपीडियाला जोडण्याऐवजी अधिक स्वतंत्र व विश्वसनीय स्रोत जोडून लेखाची गुणवत्ता व दर्जा वाढवाल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:५८, २४ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@Tiven2240: स्त्रोत म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे देण्यासंबंधी आपण म्हणता ते योग्यच आहे. पण काही दुवे एखाद्या अवयवासंबंधीच्या माहितीचे आहेत. ते [[अस्व्द।।अस्देव]] या प्रकारे दिले तर त्या नावाचा लेखच मराठीत नाही (किंवा फारच छोटा आहे). म्हणून त्याऐवजी त्या अवयवासंबंधी माहिती देणार्‍या इंग्रजी विकिपीडिया पानाकडे <ref>https://en.wikipedia.org/...</ ref> या प्रकारे स्त्रोत म्हणून निर्देश केला आहे.

इतर ठिकाणी स्त्रोत म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे देणे मी नाइलाजानेच करत आहे. माझा हा लेख इंग्रजी विकीपीडियावरील ‘Breast’ या लेखावर बराचसा आधारलेला असल्याने (पूर्ण भाषांतरित नव्हे) मी स्त्रोत म्हणुन त्याकडे निर्देश करत आहे.

पण विश्यावसनीयतेच्या याच कारणांसाठी ‘मराठी विश्वकोशाचे’ किंवा ‘Encyclopedia Britanica’, ‘Encyclopedia Americana’ यांचेही दुवे देता येणार नाहीत.

तसेच प्राथमिक स्त्रोताची विश्वसनीयताही कशी तपासायची? आता इंटरनेट स्थळावरील माहीतीही किती विश्वसनीय असते? Text books, Reference Books फक्त विश्वसनीय मानायची का? (पण इंटरनेट स्थळाइतकी ती वापरायला, लगेच पडताळून पाहायला व अधिक माहिती मिळवायला सोपी नाहीत.)

शिवाय मी लिहीत असलेल्या (व पुढे लिहिणार असलेल्या) वैद्यकीय विषयांवरील लेखांसाठी मराठीमधे फारच कमी स्त्रोत उपलब्ध आहेत.

माझ्या आधीच्या दोन लेखांपासूनच हे प्रश्न मला पडलेले आहेत. आपण व इतर तज्ज्ञ प्रचालकांनी याविषयी व एकूणच या बाबतीत मराठी-विकि धोरणे काय आहेत याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.

--Rajendra prabhune (चर्चा) २१:१६, २५ एप्रिल २०१८ (IST)[reply]