चर्चा:सुधाकरराव नाईक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माहितीचौकट

माहिती चौकट दिली जावी.[संपादन]

सरपंच पासून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे सुधाकरराव नाईक हे एकमात्र व्यक्तीमत्व असून या लेखात बरीच सुधारणा हवी. माहितीचौकट देण्यात यावी. जेणेकरून लेखात सुटसुटीतपणा येईल. व सुधाकरराव नाईक यांचे फोटो देखील अटॅच करण्यात यावे. Govr1 (चर्चा) १३:००, १ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]

@Govr1:, येथे पुढील आणि मागील मध्ये जे शरद पवार लिहिले आहे, ते नाईक यांच्या अगोदरचे आणि नंतर चे मुख्यमंत्री म्हणून आहे. आणि राज्यपाल म्हणजे, नाईक यांच्या त्या टर्म मधील जे राज्यपाल होते त्यांचे नाव. अशा प्रकारे नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीतील आठ टर्म आपण येथे लिहू शकता. अधिक माहिती साठी कृपया इंदिरा गांधी पाहावे. - संतोष गोरे ( 💬 ) ०६:०२, २ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]
@Govr1 आणि संतोष गोरे:,
तुम्हाला संतोष गोरे अनेक प्रकारे मदत करीत आहेत, माहितीचौकट शोधून भरुन देत आहे हे पाहून आनंदच आहे. मी सुद्धा तुम्हाला शक्य ती मदत करीत आहेच. परंतु हे लक्षात घ्या की आपण कोणीही येथे पगारदार नोकर नाही आहोत. मराठी विकिपीडिया हा स्वयंसेवी प्रकल्प आहे आणि प्रत्येक सदस्य याचा सर्वांगीण प्रकारे, सगळ्या विषयांमधून विकास व्हावा यासाठी झटत आहेत.
तुम्ही येथील नियम, संकेत, परिभाषा आत्मसात करुन अधिकाधिक योगदान स्वयंपूर्णपणे कराल ही आशा आणि अपेक्षा आहे. काही अवघड प्रश्न किंवा समस्या आल्यास इतर लोक आहेतच याची खात्री बाळगावी.
अभय नातू (चर्चा) ०९:३५, २ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]
cc:@संतोष गोरे:

धन्यवाद, मागील पुढील मुख्यमंत्री म्हणून शरद पवार येथे दोन दोन तक्त्यामध्ये आहे. खालील तक्ता कमी करायला हवे किंवा माहिती चौकट मधिल कमी करायला नको का Govr1 (चर्चा) १४:३९, २ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]

असू द्या. जे जे माहीत आहे ते सर्व टाकावे. आपण नाही टाकले तर दुसरे कुणीतरी टाकू शकतो. एवढंच नाही तर कोणत्याही लेखात 'आरोप किंवा टीका, आक्षेप' अशा नावाचा एखादा परिच्छेद कुणीही टाकू शकतो (त्याला संदर्भ/दुवा देणे आवश्यक आहे). आपण ते उडवू शकत नाहीत. काही नेते, अभिनेते, व्यावसायिक यांच्या पानावर असे परिच्छेद आहेत. असो. लिखाण चालू ठेवावे. - संतोष गोरे ( 💬 ) १९:०२, २ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]