Jump to content

चर्चा:सत्यनारायण पूजा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सत्यनारायण पूजेच्या कथेत कालोचित बदल करून त्या समजून घेणे आवश्यक आहे असे वाटते. नारायण म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेली चैतन्यशक्ती.तिचे स्मरण करताना सत्याचे आचरण करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे असे वाटते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

ज्ञान प्रबोधिनी पुणे प्रकाशित सत्यनारायण पोथी

सस्त्यनारायण हा हिंदू देव नाही

[संपादन]

पेशव्यांच्या कारकीर्दीत सत्यनारायणाची पूजा नव्हती. असती तर पेशव्यांनी सहस्र पूजेचे सहस्र संकल्प केले असते. विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकांत महाराष्ट्रात या व्रताचा प्रसार झाला. सत्यनारायणाची पूजा व मुसलमान पीरांची पूजा यांत बरेच साम्य आहे. बंगाली मुसलमान पीरांच्या पूजेचे नाव ‘सत्यपीरेर पूजा’ असे आहे. सत्यपीराला शिरणी (प्रसाद) अर्पण करण्याची चाल असून तशी प्रथा बंगाली हिंदूंच्या सत्यनारायण पूजेत दिसून येते. ही प्रथा तिथून महाराष्ट्र व अन्य प्रदेशांत प्रचलित झाली. महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश तेलंगण, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात सत्यनारायणाजी पूजा असते. महाराष्ट्रात चतुर्थीला, एकादशीला आणि पौर्णिमेला ही पूजा करत नाहीत, असे म्हणतात. त्याउलट आंध्र प्रदेशात एकादशी आणि पौर्णिमेलाच पूजा करायची पद्धत आहे.

पुण्यातील कॅन्टॉनमेन्टच्या सरहद्दीवर एक साचा पीर आहे. त्याच नावाचा रस्ताही आहे. हा पीर (संत) म्हणजेच सत्यनारायण असावा. ... (चर्चा) २१:१८, २७ ऑगस्ट २०१६ (IST)[reply]

लेखात योग्य ते बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. लेखाचे नाव बदलून ते सत्यनारायण पूजा /सत्यनारायण व्रत असे करावे असे वाटते. आर्या जोशी (चर्चा)

शीर्षक बदल केला. कथा विभागात कथेचा संक्षीप्त परिचय असावा. पूर्ण कथा कॉपीराईट फ्री ग्रंथातून विकिस्रोत प्रकल्पात जावी असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०७, १७ जुलै २०१७ (IST)[reply]