Jump to content

चर्चा:श्रीनिवास हरि दीक्षित

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@J: श्रीनिवास हरि दीक्षित यांच्या मृत्यूच्या दोन वेगवेगळ्या तारखा आल्याच्या दिसतात. आपल्या सवडीनुसार [काळ सुसंगतता?] तपासून घ्यावी ही नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३९, २९ एप्रिल २०१४ (IST)[reply]


महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर ३ ऑक्टोबर २०१३ ही तारीख दिली आहे, ती बरोबर असावी. ७ ऑक्टोबर कोठून आणली आणि कोणी दिली ते तपासावे लागेल.....J (चर्चा) ११:४३, २९ एप्रिल २०१४ (IST)[reply]


दोन्ही लेखांतील मजकूर एकत्र केला. तो आधीचा लेख कुणी लिहिला होता ते पहायचे राहून गेले....J (चर्चा) ११:५५, २९ एप्रिल २०१४ (IST)[reply]


’तो’ लेख बहुधा मीच लिहिला होता. त्यासाठी कदाचित महाराष्ट्र टाइम्सच्या ९ ऑक्टोबर २०१३ च्या बातमीचा [१] आधार घेतला असावा. बातमी अशी आहे :-

"तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. श्रीनिवास दीक्षित (वय ९३) यांचे मंगळवारी निधन झाले." ९ ऑक्टोबरच्या आधीचा मंगळवार ८ तारखेला होता, त्यामुळे ७ तारीख चुकीची असावी, किंवा बातमीतला मंगळवार चुकीचा असावा. ३ तारखेला गुरुवार होता, तेव्हा तीही तारीख चुकीची. नक्की तारीख शोधण्यासाठी पत्रव्यवहार करणे आले....J (चर्चा) १३:१०, २९ एप्रिल २०१४ (IST)[reply]