चर्चा:शिव्या

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक सुचवण

आतापर्यंत लिहून झालेल्या लेखात 'शिव्या साधारणपणे लोकांच्या नातेवाईकांना उद्देशुन (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) असलेल्या दिसतात. त्यामध्ये आई, बहिण या नात्यांचा जास्त वापर झालेला दिसतो.' ही वाक्ये अत्यंत माहितीपूर्ण, उद्बोधक, समर्पक आणि तारतम्यपूर्ण वाटली.

पैकी दुसर्‍या वाक्याच्या संदर्भात, अशा शिव्यांची एखादी वर्गवार यादी, सूची अथवा कोश लेखातच समाविष्ट केल्यास लेख अधिक उपयुक्त ठरावा.

- टग्या 18:37, 11 जानेवारी 2007 (UTC)

माझ्या मते या विषयावर 'खोलवर लिहिणे' म्हणजे असभ्य ठरेल !→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:42, 11 जानेवारी 2007 (UTC)
सहज चर्चा पाहिली. जर असा लेख लिहायचा झाला आणि जर विकिपीडिया हा ज्ञानकोश आहे असे आपल्या सर्वांचे मत असेल तर 'खोलवर लिहिणे' अजीबात असभ्य नाही. ज्ञानाचा वापर प्रत्येक व्यक्ती कशासाठी करते यावर अवलंबून असते. कदाचित ग्रामीण भाषा लिहिताना, एखाद्या पात्राच्या तोंडी शिवराळ संवाद घालायचे झाल्यास किंवा सहज अर्थ हवा म्हणूनही माणसाला ज्ञानकोशात चाळून हे मिळेल.
संदर्भासाठी/ पुष्टीसाठी इंग्रजी विकिवरील दुवा देत आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Profanity#Severity
priyambhashini 19:25, 11 जानेवारी 2007 (UTC)
मुळात 'शिव्या साधारणपणे लोकांच्या नातेवाईकांना उद्देशुन (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) असलेल्या दिसतात. त्यामध्ये आई, बहिण या नात्यांचा जास्त वापर झालेला दिसतो.' ही वाक्ये लिहिणे जर असभ्य नाही, तर मग त्या शिव्यांची यादी बनवली, तर तेच नेमके असभ्य कसे?
वर संदर्भ दिलेला इंग्रजी विकिलेख एकदा पहाच. दोन गोष्टी लक्षात येतील:
१. 'सीव्हियरिटी' या उपसदरात सर्वांत जास्त 'प्रखर' शिव्यांची एक 'टॊप टेन' यादी आहे. (थोडक्यात, 'सर्वोच्च' १० शिव्या प्रत्यक्षात उद्धृत केलेल्या आहेत.
२. 'इंटरलॆंग्वेज' या उपसदरात वेगवेगळ्या भाषांतील शिव्या सहसा कशावर आधारित असतात याची तुलना केलेली आहे. जसे, जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॆनिश आदि भाषांतल्या शिव्या मलोत्सर्जनाबद्दल तर इंग्रजीतल्या लैंगिक विषयसंबंधी (इथे 'विषयसंबंधी' या शब्दावरील श्लेष अभिप्रेत) असतात, वगैरे. आता हे वाक्य तर तुमच्या 'शिव्या साधारणपणे लोकांच्या नातेवाईकांना उद्देशुन (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) असलेल्या दिसतात. त्यामध्ये आई, बहिण या नात्यांचा जास्त वापर झालेला दिसतो.' या वाक्यासारखेच झाले की!
तेव्हा, आपल्या लेखात खुशाल शिव्यांची लाखोली वहा. त्याला आक्षेप असू नये. आक्षेप लेखनविषयाला नाही, लेखनाच्या पद्धतीला आहे. शिव्या देताना(-म्हणजे यादी करताना-)सुद्धा भाषा 'ऎकेडेमिक' वाटली पाहिजे असे बघा. आणि थोडे विस्तृत लिहा. आपली वरील उद्धृत केलेली वाक्ये नुसतीच वाचली तर फार विचित्र वाटतात, आणि कदाचित आक्षेपार्ह ठरतील. पण थोडे विस्ताराने, मुद्देसूद पृथक्करणासमवेत (detailed analysisसहित) आणि सोदाहरण लिहिलेत, तर हा एक अभ्यासपूर्ण लेख ठरू शकेल.
शेवटी काय लिहिताय यापेक्षा कसे लिहिता यावर सर्व आहे. भाषा आणि सखोल अभ्यास महत्त्वाचा. या अनुषंगाने त्या इंग्रजी लेखाचा अभ्यास करणे मार्गदर्शक ठरावे.
-टग्या 19:53, 11 जानेवारी 2007 (UTC)

I am floored! Are we going to expand this artice? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:45, 11 जानेवारी 2007 (UTC)

Nothing wrong with expanding it. I would strongly suggest one(or two) person(s) to take charge of this page and keep a close watch on it to ensure that un-necessary crudeness and/or personal attacks are not introduced in this page.
Volunteers?
अभय नातू 19:47, 11 जानेवारी 2007 (UTC)

थोडा बदल

मी मूळ लेखात थोडा बदल केला आहे. विस्ताराने लिहायला अजीबात हरकत नाही. उलट तो लिहावा, त्यात काहीही गैर नाही. तो कोणत्या आणि कशा शब्दांत मांडला आहे हे मात्र महत्त्वाचे ठरेल. शिव्यांच्याबाबतीत माझा डेटाबेस मात्र अत्यल्प आहे. :))))

priyambhashini 19:57, 11 जानेवारी 2007 (UTC)

माझा भरमसाठ आहे!! मराठी भाषा शिव्यांनी अलंकृत आहे हा उपरोधिक मजकूर काढून टाकावा.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 20:14, 11 जानेवारी 2007 (UTC)
या लेखाला वेगळा ऍप्रोच देता येईल. जसे देशावरील, कोकणातील शिव्या. मुंबईतील मूळ शिव्या परंतु सर्रास रूढ झालेले शब्द, जसे "साला". प्रसिद्ध मराठी लेखकांनी साहित्यात केलेला शिव्यांचा वापर किंवा तशी साहित्यातील प्रसिद्ध पात्रे इ. सर्व नमूद करता येईल.

काय आहे की विस्तार आपण चांगल्या रीतीने केला तर लेख माहितीपूर्ण आणि सुसभ्यच होईल. अधिक कल्पना असल्यास कृपया कळावे,माझ्यापरीने विस्तार करणे मला नक्की आवडेल.

priyambhashini 20:59, 11 जानेवारी 2007 (UTC)

धर्म व जातीवाचक शिव्या

मी येथे कृपा करून अशा शिव्या (विशेषतः जातीवाचक) येथे उद्धृत करू नयेत. असे केल्यास विकिपिडीयावर भारतीय कायद्यानुसार (ऍट्रोसिटीज ऍक्ट, इ.) कारवाई होउ शकते. असे लिहिले असले तरी मला खात्री नाही की हे बरोबर आहे.

कथित शब्द येथे लिहिण्यामागचे कारण त्यांची मीमांसा करणे हा आहे. तरी ते कायदेबाह्य धरता येणार नाही, पण मी कायदेतज्ञही नाही :-) तरी कोणी यावर अधिक प्रकाश टाकू शकेल काय?

अभय नातू 22:11, 11 जानेवारी 2007 (UTC)


होय, मी अभयशी सहमत आहे. अशा शिव्यांची यादी होता कामा नये. कोणाला येथे कोणत्या सालच्या कायद्यानुसार आणि कलम माहित असेल तर ते कृपया घालावे.
priyambhashini 22:15, 11 जानेवारी 2007 (UTC)

How about semiprotection to this article?

हे पान व्हँदलायझर्स चे भक्ष्य केव्हा होईल हे सांगता येत नाही,यापानाचे सेमीप्रोटेक्शनचे मी समर्थन करेन. Mahitgar 00:51, 12 जानेवारी 2007 (UTC)

Protected from IP address users.
अभय नातू 01:43, 12 जानेवारी 2007 (UTC)

suggesting notice cum disclaimer format for the article

सावधान या लेखाचा उद्देश्य मानवी तसेच मराठी संस्कृतीत होणार्‍या शिव्यांच्या उपयोगा बद्दल विश्वकोशिय संदर्भात दखल घेणे एवढाच आहे.या लेखात अशिष्ट आणि अश्लिल शब्दांचा संवादांचा उदाहरणा दाखल वापर असू शकतो. अशिष्ट आणि अश्लिल शब्दांच्या वाचनामुळे ज्यांच्या मनाला इजा पोहचेल अशा व्यक्तिंनी या लेखाचे वाचन करू नये.जातीय आणि धार्मिक उल्लेख कुणीही करू नयेत हि नम्र विनंती असा उल्लेख आढळल्यास वगळला जाईल आणि या लेखाच्या वापराची जबाबदारी ज्याची त्याची स्वतःवर असेल हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

हा लेख अनामिक सदस्यांना संपादनास प्रतिबंधीत आहे. आपण मराठी विकिपीडियाचे सदस्यत्व घेऊन हा लेख संपादीत करू शकता.


हे डिस्क्लेमर सुरवातीचे वाक्य मथळ्या जवळ ठेवून बाकी डिसक्लेमरला दुवा द्यावा.