चर्चा:शिवमंदिर, मुखेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शीर्षक[संपादन]

या लेखाचे शीर्षक "शिवमंदिर, मुखेड" असे लिहिणे अधिक बरवे ठरेल. सध्याचे "मुखेड येथील शिवमंदिर" हे एखाद्या निबंधात्मक लेखाचे शीर्षक असाव्र्, तसे काहीसे वाटते.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०१:१८, १६ जानेवारी २०१२ (UTC)

मुखेडचे शिवमंदिर असेही शीर्षक करता येईल किंवा मुखेड लेखात शिवमंदिर असा विभाग करुन तेथे मजकूर हलवताही येईल.
अभय नातू ०४:४९, १६ जानेवारी २०१२ (UTC)
मराठीत आणि इंग्रजीत स्वतंत्र मंदिरकोश उपलब्ध नाहित (असल्यास माझ्या पाहण्यात नाहीत. ते माझे अज्ञान समजावे.) परंतु मंदिर याच विषयावरील स्वतंत्र अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांचा विचार केल्यास त्यामधील शीर्षके मुखेड येथील शिवमंदिर, सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर, रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, पानगाव येथील विठ्ठल मंदिर, होट्टल येथील मंदिरे इ. अशीच शीर्षके (निबंधात्मक ?) आहेत. पर्सी ब्राऊन यांच्या Indian Architecture (Budhiist & Hindu) या इंग्रजी ग्रंथातही Kedareshwar temple of Dharmapuri etc. अशा शीर्षकाने (निबंधात्मक ?) लेख आहेत. अर्थात या ग्रंथातील लेखांची शीर्षके ही त्या-त्या ग्रंथकारांचे संकेत आहेत. तेच शीर्षकसंकेत विकिपीडियावर अवलंबणे अपेक्षित नाही. या निमित्ताने मंदिरविषयक लेखांची शीर्षके कशी असावीत याचा संकेत ठरवून घेतल्यास अशा लेखांचे योग्य त्या शीर्षकाखाली स्थानांतरण करणे सोयीचे ठरेल.
आणि असा संकेत ठरत नसल्यास मुखेड येथील शिवमंदिर हा वेगळा विषय असल्याने मुखेड या लेखात शिवमंदिर या विभागात हा मजकूर हलविणे मला तरी उचित वाटत नाही त्यापेक्षा शिवमंदिर, मुखेड असे शीर्षकच बरवे राहिल.
संतोष दहिवळ ०७:१८, १६ जानेवारी २०१२ (UTC)
खरे आहे अजून चर्चा व्हावयास हवी .मुखेडमध्ये अजूनही शिवमंदीरे असतील पण विश्वकोशीय उल्लेखनीयतेत बसणारे प्रसिद्ध मंदीरा बद्दल हा लेख असणार आहे अशीच गोष्ट इतर असंख्य ठिकाणच्या मंदीरांबद्दल असेल. याचाही सुयोग्य शीर्षक लेखन संकेत बनवताना विचार व्हावा माहितगार १०:२७, १६ जानेवारी २०१२ (UTC)