चर्चा:राष्ट्रीय सागर संशोधन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करून या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) ०७:४९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)


राष्ट्रीय सागरशास्त्र संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी-एनआयओ) या संशोधन संस्थेची स्थापना दि. १ जानेवारी १९६६ रोजी झाली. एनआयओ ही सीएसआयआरच्या घटक ३७ प्रयोगशाळांपैकी एक म्हणून ओळखली जाते. एनआयओ ही एक स्वायत्त संशोधन संस्था असून संस्थेचे प्रमुख संशोधन व शैक्षणिक कार्य सागरशास्त्र (Oceanography) या विषयात चालते. एनआयओचे मुख्यालय गोव्यातील डोना पाउला येथे आहे. तसेच संस्थेची कोची, मुंबई व विशाखापट्टणम या इतर तीन ठिकाणी प्रादेशिक केंद्रेदेखील आहेत. [१] संशोधनातील योगदान :- एनआयओच्या स्थापनेपासूनच संस्थेमध्ये आंतरविद्याशाखीय संशोधनाला नेहमीच चालना व पुरेसा वाव दिला गेलेला आहे. सर्व संशोधन शाखांच्या माध्यमातून समुद्राचा विविध संशोधन मोहिमांच्या द्वारे शोध घेणे चालू असते. संस्थेकडे सागरी संशोधनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांनी सुसज्ज अशी दोन जहाज- आरव्ही सिंधू संकल्प व आरव्ही सिंधू साधना आहेत. एनआयओमध्ये खाजगी औद्योगिक क्षेत्राकडून प्रायोजित केलेले संशोधनही केले जाते. यामध्ये प्रामुख्याने महासागरीय माहिती संकलन, पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन, पर्यावरणीय प्रभावाचा अंदाज लावण्यासाठी केले जाणारे मॉडेलिंग इत्यादी विषयांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी संशोधनातील विविध संधी :-

एनआयओ फक्त संशोधन संस्था नाही तर एक देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रसुद्धा आहे. शेकडो विद्यार्थी एनआयओमध्ये पीएचडीचे संशोधन करतात. तसेच, एनआयओ भारतातील व भारताबाहेरील अनेक विद्यापीठांशी पीएचडी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादी सारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी एनआयओमध्ये ठराविक काळ (अगदी दोन महिन्यांपासून ते दोन वर्षापर्यंतचा) व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ/ एसआरएफ विद्यार्थी इथे एनआयओमध्ये पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. सध्या तिथे १०० जेआरएफ/ एसआरएफ विद्यार्थी सागरशास्त्रातील विविध विषयांत आपापल्या तज्ञ संशोधक मार्गदर्शकांच्या मदतीने त्यांचे पीएचडीचे आपले संशोधन पूर्ण करत आहेत. याव्यतिरिक्त, दरवर्षी विविध महाविद्यालय व विद्यापीठांमधील सुमारे तीनशेहून अधिक पदवी/ पदव्युत्तर विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांचे संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.

  1. ^ https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/national-institute-of-oceanography-sea-research-1610840/