चर्चा:राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन
Appearance
ज यांचा उत्पात
[संपादन]- @अभय नातू आणि V.narsikar: साचे उलटवणे हे ज यांच्याकडून नविन नाही. ह्या पानाचा इतिहासात स्पष्ट दिसते की, त्यांनी मी लावलेला पानकाढा साचा परस्पर कसलीही चर्चा न करता किंवा साचे प्रचालकांच्या निर्णयाने काढले जावेत असा संकेत असताना ही त्यांनी परस्पर साचा काढला आहे.
- मुळात याद्यांचे लेख करणे आणि ते टिकवण्यासाठी हट्ट धरणे ही बाब सुद्धा नविन नाही. त्यामुळे याद्यां स्पष्टपणे सांगून काढून टाकण्यात याव्यात अशी विनंती. WikiSuresh (चर्चा) १०:४३, ५ ऑगस्ट २०१८ (IST)
- @Sureshkhole:,
- यादीवजा लेख मराठी विकिपीडियावर अभावानेच पाहिजेत हे माझे स्पष्ट मत आहे. ज यांच्याशी यावरुन माझा वादही झाला होता. यादीपेक्षा वर्ग करावे ही माझी सूचना होती/आहे परंतु ज यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
- असे असताही इतरांवर माझेच मत दामटले असे होऊ नये म्हणून हे चालविले गेले आहे. शिवाय त्यांनी याद्यांमधून घातलेली माहिती लुप्त होऊ नये हा ही त्यातील भाग.
- असो. या याद्यांमधील मजकूर/माहिती इतरत्र कसा घालता येईल याचा विचार करावा ज्यायोगे असलेली माहिती जाणार नाही. या लेखाचे उदाहरण घेतले तर छोटी मराठी साहित्य संमेलने किंवा तत्सम शीर्षकाच्या लेखात अशी संमेलने आणि त्यांबद्दलची १, २, ५ वाक्ये जी आहेत ती घालता येतील.
- यापुढे यादीवजा लेख झाल्यास त्यावर उपाय केला जाईल. दिसल्यास लक्ष वेधून द्यावे ही विनंती.
- अभय नातू (चर्चा) ०७:०३, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
- @अभय नातू आणि V.narsikar:
- यादीचा वर्ग होऊ शकतो किंबहुना तो आहेच हे आपणच सुचवलेले आहे.
- दूर्दैवाची बाब अशी की, ज कधीच संदर्भ देत नाहीत किंवा संदर्भाबद्दलचा विचारही करित नाहीत. त्यामुळे अनेकदा सुचवूनही जर संदर्भ दिले नसतील तर तो मजकूर तसाही टिकवणे मुष्कील आहे.
- छोट्या साहित्य संमेलनांचा एकाच पानात उल्लेख करणारा लेख करता येईल पण त्यातही संदर्भ देण्याची जबाबदारी ज घेणार नाहीत. ती ते घेत असतील तरच आता ज यांचा संदर्भहीन मजकूर टिकवण्याचा विचार व्हावा असे माझे स्पष्ट मत आहे. आधीच ज यांच्या उत्पाताने, प्रताधिकार भंगाने बरेच काम पडले आहे. त्यामुळे आतातरी ज यांबद्दल कडक भूमिका घेण्यात यावी.
- त्यामुळे ज्या याद्यांचा वर्ग होऊ शकतो किंवा आहे, त्या याद्या काढण्यात याव्यात असे मी सुचवत आहे. WikiSuresh (चर्चा) १०:४०, ७ ऑगस्ट २०१८ (IST)
- ज्या याद्यांचा वर्ग होउ शकतो/आहे त्यांतील मजकूर/माहिती इतर ठिकाणी घालून मगच ती वगळण्यात यावी.
- ज यांनी केलेल्या पूर्वीच्या लेखनाकडे लक्ष ठेवून यापुढे होणाऱ्या लेखनाबद्दल पावले उचलली जातील.
- अभय नातू (चर्चा) ११:४४, ७ ऑगस्ट २०१८ (IST)