चर्चा:रथयात्रा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रथयात्रा ही केवळ देवांच्या मूर्तीची यात्रा नसते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, आरक्षणे यांसारख्या कारणांसाठी रथयात्रा निघालेल्या आहेत.. जैन व अन्य धर्मगुरूंच्या रथयात्रा नित्य पहायला मिळतात. या यात्रांच्या रथांत कुठलाही देव नसतो.

अटलबिहारी बाजपेयी यांनी एक आणि लालकृष्ण आडवाणी यांनी किमान सहा रथयात्रा काढल्या..

आडवाणींची पहिली रथयात्रा १९९०च्या दशकात सोमनाथ-अयोध्या अशी होती. या रथयात्रेमुळॆ राजकारणाची हवा बदलली आणि विश्वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार पडले.

आडवाणींची एक रथयात्रा काळा पैसा परदेशातून परत आणण्यासाठी होती, पण ती मध्येच बंद करावी लागली.

जनसंघाने १९९० साली रथयात्रा काढली हॊती, तेव्हा आडवाणी आणि जनसंघाच्या अन्य नेत्यांनी तीत भाग घेतला होता, मात्र बाजपेयींनी घेतला नव्हता. ही रथयात्रा जेव्हा बिहारमध्ये पोचली तॆव्हा २३ ऑक्टोबर १९९० या दिवशी आडवाणीना अटक झाली.

आडवाणींची जनादेश नावाची रथयात्रा भारताच्या चाऱ्ही कोपऱ्यांतून सप्टेंबर १९९३ मध्ये सुरू झाली होती.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ५० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने सुवर्णजयंती रथयात्रा निघली होती. ही १९९७ सालच्या मे महिन्यात सुरू होऊन जुलैमध्ये समाप्त झाली.

आडवाणींनी २००४ साली भारत उदय रथयात्रा काढली होती.

२००६ साली वाराणशीमध्ये बाँबस्फोट झाले होते. काँग्रॆस सरकार धर्मक्षेत्रांचे संरक्षण करू शकत नाही याचा निषेध म्हणून २००६ सालच्या मार्चमध्ये आडवाणींनी भारत सुरक्षा रथयात्रा काढली होती.

यांशिवाय जनचेतना नावाची रथयात्रा ऑक्टोबर २०११मध्ये निघली होती. भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ निघालेली ही यात्रा अतिशय यशस्वी झाली. यात्रेची सुरुवात जयप्रकाश नारायणांच्या बिहारमधील सिताब दियारा गावापासून झाली व समाप्ती दिल्लीच्या रामलीला मैदानावर झाली.

पुन्हापुन्हा रथयात्रा काढल्यामुळे यात्रांधील जोश, उत्साह, नावीन्य संपले आणि आडवाणींचे राजकीय पतन सुरू झाले. ...... (चर्चा) २२:२२, ११ जुलै २०१९ (IST)[reply]