चर्चा:येमेनमधील निवडणुका
Appearance
@Tiven2240:, मशिन भाषांतरात अनेक त्रुटी रहातात. तरी लेख डोळ्याखालून घालावा आणि चुका दुरुस्त कराव्यात ही विनंती. उदा.प्रस्तावनेतच चुका आहेत (येमेनचे यमन).हा लेख स्पर्धेसाठी सादर झाला असल्याने लक्ष वेधले आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:२८, १६ नोव्हेंबर २०१८ (IST)
- कृपया येमेनचे प्रजासत्ताक पहा. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) १०:१९, १६ नोव्हेंबर २०१८ (IST)
- लेख पाहिला. तोही सुधारणे आवश्यक आहेच. आपण संबंधित संपादकांनाही साद द्यावी. स्पर्धेतला लेख परीक्षणासाठी बिनचूक असावा अशी अपेक्षा आहे.
- लेख पाहिला. तोही सुधारणे आवश्यक आहेच. आपण संबंधित संपादकांनाही साद द्यावी. स्पर्धेतला लेख परीक्षणासाठी बिनचूक असावा अशी अपेक्षा आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:५४, १८ नोव्हेंबर २०१८ (IST)
- विकिपीडिया एक मुक्त ज्ञानकोश आहे त्यात कोणीही संपादन करू शकतो. जर आपल्याला लेखात काहीही बदल करायचे असतील तर आपण ती करू शकतो. त्यात आपलया कोणीही थांबवू शकत नाही. विनाकारण "स्पर्धेतला लेख परीक्षणासाठी बिनचूक असावा अशी अपेक्षा आहे." म्हणून नवीन विधान स्वतः तयार करून ही चर्चा दिशाभूल करू नये. असो ५१,०००+ लेख आहेत त्यात कुठले लेख बिनचूक असतील याची यादी तयार करा मला त्यातून प्रेरणा मिळेल. --Tiven2240 (चर्चा) १५:५२, १८ नोव्हेंबर २०१८ (IST)
- किमान चुका तरी दुरुस्त कराल अशी आशा आहे. उदा-यमन. मशीन भाषांतरे करून केलेले भाषेच्या दृष्टीने अर्धवट लेख इतरांनी सुधारावेत अशी अपेक्षा ठेवून लेख भरणा करण्याची पद्धत चुकीची आहे असे माझे मत आहे. -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:१७, १८ नोव्हेंबर २०१८ (IST)
- मशीन भाषांतर? याची पुष्टी आपण कशी केली याची माहिती सांगितले तर चांगले असेल. मी सद्या कॅम्ब्रिज शब्दकोश पाहत होतो, त्यात यमन व येमेन दोन्ही उच्चारण आहे. तर आपण यमन हे योग्य आहे याबाबत निर्णय कुठून घेतला ?. पुन्हा एकदा वर माझे विकिपीडियावर असलेले मत पहा. ते माझे नाही तर हे प्रकल्पाचे एकमत आहे की या विश्वकोश कोणीही संपादित करू शकतो. कृपया विकिपीडियाचे धोरण व मार्गदर्शन तत्वांचे आदर करा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १७:२३, १८ नोव्हेंबर २०१८ (IST)
- किमान चुका तरी दुरुस्त कराल अशी आशा आहे. उदा-यमन. मशीन भाषांतरे करून केलेले भाषेच्या दृष्टीने अर्धवट लेख इतरांनी सुधारावेत अशी अपेक्षा ठेवून लेख भरणा करण्याची पद्धत चुकीची आहे असे माझे मत आहे. -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:१७, १८ नोव्हेंबर २०१८ (IST)
- @अभय नातू आणि V.narsikar: प्रस्तुत लेखात लेखाच्या भाषेवरून आणि लिंगाच्या चुकीच्या वापरावरून स्पष्ट दिसत आहे की, हा लेख मट्रा आहे. असे अनेक लेख करायची आणि ते तसेच सोडून देण्याची वाईट प्रथाच पडत आहे.
- तेव्हा आपण आणि इतर भाषेचे ज्ञान असलेल्या सदस्यांनी सदर लेखाकडे लक्ष द्यावे, टायवीन यांचा एकूण उत्पात लक्षात घेता ते परस्पर साचे उलटवण्याचे प्रकार करण्याची शक्यता आहेत म्हणून आपल्याला साद दिली आहे. धन्यवाद!!!QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:५४, १९ नोव्हेंबर २०१८ (IST)
@अभय नातू आणि V.narsikar: सामान्य मट्रा हा खराब अनुवादित लेखात जोडले जातात. परंतु हा लेख खराब अनुवादित आहे का? माझ्या मते याला {{विस्तार}} साचा योग्य असेल. आपले मार्गदर्शन हवे. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) १३:१९, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)
हा लेख २०१८ च्या विकिपीडिया आशियाई महिना स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |