चर्चा:माझगाव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतर ठिकाणाहून येथे लावलेला मजकूर सुधारून लेखात घालावा.

अभय नातू १७:५२, ३० डिसेंबर २०११ (UTC)


माझगाव हा शब्द माझं गाव आणि माझागोन (माझगाव वर पोर्तुगीज राज्य करीत होते) तर केथेलिक ह्याला माझगोन असेही म्हणत होते. हे सात बेटांपैकी एक बेट होय. माझगाव हा दक्षिण मुंबईचा विभाग असून रेल्वेच्या भायखला स्टेशन व हार्बरच्या डॉकयार्ड व सेंडहर्स्ट रोड स्टेशनने जोडले गेले आहे. माझगाव मध्ये केंद्र सरकारी संस्था जशा, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि माझगाव डॉक लिमिटेड असून, माझगाव कोर्ट किंवा न्यायालय देखील येथे आहे. इतकेच नव्हे तर येथे अेन्गलो इंडिअन शाळा असून त्यामध्ये सेंट पीटर आणि सेंट मेरी यांचा समावेश आहे.

माझगाव हा शब्द संस्कृत शब्द मत्स्य ग्राम या शब्दापासून तयार झाला आहे असे म्हणतात. याचा अर्थ माशांचा गाव असा होतो. येथील मूळ रहिवाशी हे आगरी आणि कोळी समाजाचे होते. याचबरोबर असेही मानण्यात येते कि माझगाव हा शब्द मराठी माझं गाव ह्या शब्दापासून तयार झाला आहे असे म्हणतात. माझगाव हा शब्द पोर्तुगीजान्पासून सुद्धा तयार झाला असावा असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी माझगाव हा विभाग आंब्याच्या झाडांसाठी फार प्रसिद्द होता. २० व्या शतकात देखील यांतील काही जाती दिसून आल्यात. हे छोटेसे बेट उत्तरेकडे वाढना-या छोट्या छोट्या डोंगरानि आणि बंदराकडील बाजूकडे किना-यांनी वेढलेले असून कोंकणाची आठवण करून देते.