चर्चा:महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Gnome-edit-redo.svg:

अमरावती विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ, अौरंगाबाद विद्यापीठ, पुणे विद्यापीठ ही विद्यापीठांची अधिकृत नावे नाहीत; ती जुनी नावे आहेत.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही या विद्यापीठांची अधिकृत नावे आहेत.

विकिपीडियावर लेख लिहिताना अधिकृत नावे लिहावीत की जुनी नावे लिहावीत याविषयी कृपया खुलासा करावा....

अभय होतू (चर्चा) २०:४९, २२ ऑक्टोबर २०१७ (IST)


माझ्या मते विकिपीडियावर लेखाचे मथळे लिहिताना प्रचलित/सर्वज्ञात नावेच लिहावीत; 'नारायण सूर्याजी ठोसर' न लिहिता 'रामदास' लिहावे. असेच साने गुरुजी, वि.स. खांडेकर वगैरे. तसे न केले तर लॊकांना लेख सापडणे फार अवघड जाते. जरूर तर त्या नावांना लिंक देऊन भविष्यात कधीही लोकप्रिय न होणाऱ्या तथाकथित अधिकृत नावाकडे निर्देशित करावे. जुनी पारंपरिक नावे कायमची असतात, नव्या नावांचे तसे नाही. राज्यकर्ते बदलले की नामांतरे हॊतात. मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव तीनदा बदलले. आधी व्हीटी, मग एसटी, मग सीएसटी आणि आता सीएसएसएमटी (छत्रपती श्री शिवाजी महाराज टर्मिनस). तिरुअनंतपुरम, गुवाहाटी ही अशीच उदाहरणे. बंगळुरु की रुलु की रुळू की बंगळूर हे नक्की माहीत नसेल तर बंगलोरचे पान कधीही उघडता येणार नाही. आपल्याला कानडी वाचता येत नाही, नक्की नाव काय आहे कोण जाणे! बरे सध्या अधिकृत असलेले नाव भविष्यकाळात अधिकृुतच राहील याची खात्री नाही.

एक स्थान अनेक नावे या लेखात ओरिसाला किती विविध अधिकृत नावे आहेत, यावर नजर टाकल्यास याचा अंदाज येईल.

कलकत्ता शहराला बंगालीत कलिकाता आणि कलकाता अशी दोन नावे होती, अजूनही आहेत. त्यांपैकी कलकाताचा उच्चार कोलकाता व्हायचा आणि आजही होतो. इंग्रजी स्पेलिंग बदलले तरी गाव आणि नाव तेच राह्यले. बंगालीत अजूनही कलकाता हे जुने समजले जाणारे रूढ नावच लिहितात.

वेगळ्या पद्धतीची स्पेलिंगे स्वीकारल्यामुळे पेकिंगचे फक्त स्पेलिंग बीजिंग झाले, पण उच्चार पीकिंगच राहिला.

जुने ते सॊने या नियमाने परंपरागत नावे लिहिण्यात कोणताही धोका नसतो. ... (चर्चा) २२:२०, २२ ऑक्टोबर २०१७ (IST)