चर्चा:महादजी शिंदे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) २०:५१, ५ एप्रिल २०१८ (IST)[reply]


इ.स. १७३०-१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.मराठा कालखंडातील एक पराक्रमी सरदार होते.सातार्याजवळील कन्हेरखेड हे त्यांचे मूळ गाव.त्यांचे वडील राणोजी हे मराठ्यांच्या दरबारातील मातब्बर सुभेदार होते. महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळेच मराठी सत्तेचा उत्तरेकडे विस्तार मोठया झपाटयाने झाला. त्यातूनच ग्वाल्हेर(पूर्वीचे उज्जैन)शिंदे घराण्याचे मुख्य ठाणे म्हणून स्थापन केले.शिंदे घराण्यात अनेक पराक्रमी वीर जन्माला आले. यापैकी दत्ताजी शिंदे यांनी पानिपतच्या मैदानावर दिलेला बचेंगे तो और भी लढेंगे हा नारा आजही लोकप्रिय आहे. दत्ताजी यांचे  बंधू महादजी यांनी आपले शौर्य आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर मराठ्यांचे साम्राज्य तोलून धरले.

ग्वाल्हेर येथे आपल्या गादीची स्थापना करून महादजी यांनी उत्तरेकडे साम्राज्य वाढविले.महादजी यांच्या मातोश्री राजपूत समाजातील होत्या. त्यांनी महाराष्ट्रातील घराण्यात विवाह केले. महादजींचे नऊ विवाह झाले होते.

१)अन्नपूर्णाबाई(बीड येथील निंबाळकर घराणे) २)भवानीबाई(घाटगे घराणे) ३)पार्वतीबाई(नरसिंग घाटगे यांची बहीण) ४)भवानीबाई(संगमनेर येथील देशमुख घराणे) ५)गंगाबाई(पलवेकर घराणे) ६)राधाबाई(पद्मसिंग राऊळ घराणे), ७)भागीरथीबाई(कर्डेकर घराणे) ८)यमुनाबाई(रामलिंग राऊळ घराणे) ९)लक्ष्मीबाई(तुळजापूरचे भोपे-कदम घराणे).

   त्यांच्या पहिल्या पत्नी अन्नपूर्णाबाई या बीड येथील निंबाळकर घराण्यातील होत्या.नवव्या पत्नी लक्ष्मीबाई या तुळजापूरच्या भोपे-कदम घराण्यातील होत्या. महादजी शिंदे पानिपतच्या युद्धात लढत असताना अन्नपूर्णाबाई यांनी ते सुखरूप परत यावेत म्हणून बीडचे सुफी संत मन्सूरशहा यांच्याकडे प्रार्थना केली होती.महादजी यांना एक पाय गमवावा लागला तरी ते सुखरूप परतले.नंतर महादजी यांनी मन्सूरशहा यांचे शिष्यत्व पत्करले. नंतर ते तुळजाभवानीमातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला आले.महादजी यांच्या बहिणीचा विवाह वाशी(जि.उस्मानाबाद)येथील कल्याणराव देशमुख-कवडे यांच्याशी झाला होता.त्यांची भेट घेऊन परत जाताना वाटेत. अन्नपूर्णाबाई यांचे १६ एप्रिल १७९२ मध्ये नांदूरघाट येथे निधन झाले.त्यावेळी महादजी यांचा नांदूरघाट येथे १३ दिवस मुक्काम होता.त्यादरम्यान त्यांनी तेथे अन्नपूर्णाबाई यांची समाधी बांधली. 

फोटो[संपादन]

श्रीमंत महादजी शिंदे

श्रीमंत महादजी शिंदे यांची समाधी

संदर्भ[संपादन]

१ दि हिस्ट्री आॅफ ब्रिटिश इंडिया - जेम्स मिल्स