चर्चा:भैदनासाठी न्यूटनचा दर्शक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुधारित आवृत्ती:.

एखाद्या फलाचे(फ़ंक्शनचे) भेदन(डिफ़रन्सिएशन) दाखवण्यासाठी न्यूटनने एक साधे टिंब वापरण्याची युक्ती केली होती. त्यामुळे कमी अक्षरे वापरून भेदिज दाखवता येते. ह्या पद्धतीत क्षचे t-दृष्ट्या भैदिज दाखविण्यासाठी 'x’वर एक टिंब दिले( \dot{x} )की (\frac{dx}{dt}) असा अर्थ व्यक्त होई. न्यूटन ह्या टिंबाला फ्लक्सियॉन म्हणे.

आयझॅक न्यूटनची ही टिंबपद्धती मुख्यत: यांत्रिकीमध्ये वापरली जाते. उदा०

   \dot{x} = \frac{dx}{dt} = x'(t)
   \ddot{x} = \frac{d^2x}{dt^2} = x(t)\,

मात्र, दुहेरी किंवा त्याहून वरच्या कोटीच्या भैदिजासाठी टिंब दर्शक पद्धत नीट उपयोगी पडत नाही. यांत्रिकी आणि इतर अभियांत्रिकी शाखेत, द्विकोटी भैदिजाहून जास्त कोटीच्या भैदिजाचा वापर कमीच होतो. अधिक श्रेणीच्या भेदिजासाठी अक्षराला अ‍ॅक्सेन्टची खूण करून काम भागते. उदा० x', x, x'वगैरे.

सांधने(?) फलाचे संकलन कसे दाखवावे यासाठी न्य़ूटनने कोणतेच खास चिन्ह शोधले नव्हते. तथापि त्यानंतर लिबनिझने जर्मन एस्‌ या अक्षराला जरा लांबट बनवून चिन्ह तयार केले. तेच पुढे जगन्मान्य झाले.

integration ही फलांनी जोडण्याची कृती आहे. त्यासाठी सांधन आणि differentiation ला भैदन
ह्याचेच समानार्थी शब्द अनुक्रमे संकलन आणि विकलन होय.
न्यूटन ह्या टिंबाला फ्लक्सियॉन म्हणे.<<टिंबाला नाही, टिंब देण्याच्या ह्या पद्धतीला.
सुधारित आवृत्ती व्याकरणाच्या दृष्टीने योग्य वाटते.
अनिरुद्ध परांजपे १६:५९, २२ मे २०११ (UTC)