Jump to content

चर्चा:भीम गर्जना

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@:,

मी शिर्षक बदलाचे कारण देऊनही तुम्ही हा लेखनाव व माहिती भिम गर्जना वरून भीम गर्जना ला का हलवली ? संदर्भ विभागात युटूबवरील व्हिडिओ ची लिंक आहे, त्यात एकदा चित्रपटाचे नेमके नाव (भिम ... की भीम...) काय आहे ते पाहून घ्या, व नंतर तुम्ही येथे केलेली संपादने पूर्ववत करा. धन्यवाद! --संदेश हिवाळेचर्चा ०८:२०, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]


यू ट्यूबवरच येथे पहा : [१]. सिनेमाचे पोस्टर पाहा : [२]

वर्तमानपत्रातील बातमीतले लेखन बिनचूक असते, मथळा देणारा दुसराच कुणीतरी असतो, तो सुयॊग्य लिहीलच असे नाही. छापील पुस्तकातील मजकूर शुद्धिचिकित्सकाने तपासलेला असतो, तो अचूक असतो. मुखपृष्ठावर एखादी चूक सापडतॆ, कारण ते मराठी न जाणणाऱ्या आर्टिस्टने बनवले असते. प्रसिद्ध होणारे व्यंग्यचित्र छान असते, त्यामध्ये लिहिलेला मजकूर बहुधा अशुद्ध. तद्वतच चित्रपटांचे टायटल्स बनवणारे अडाणी असतात, त्यांच्याकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करू नये. ... (चर्चा) १०:५९, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

हा चित्रपटाचा व्हिडीओ पहा, त्यात चित्रपटाचे नाव मोठ्या लाल अक्षरात भिम गर्जनाBHIM GARJANA असे दोन्ही भाषेत लिहिलेले आहे ना?
--संदेश हिवाळेचर्चा ११:२१, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]
आणि चित्रपटातील अनेक नावात फेरबदल झालेला आहे, यात कलाकार अभिनेत्री प्रथमा पण तिचे नाव Pratima (प्रतिमा) असेही चूकीचे लिहिले आहे.
--संदेश हिवाळेचर्चा ११:२४, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

इंग्रजीमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ हे दॊन्ही इकार लिहिण्यासाठी बहुधा 'i' (आय) हे मुळाक्षरच वापरतात. आय लिहिण्याने जर अर्थाचा विपर्यास होत असेल तरच अपवादादात्मक ठिकाणी `ee' (डबल ई) वापरतात. उदा0 श्री-Shri, श्रीमती-SrImatI, सीता-Sita, ईश्वर-Ishvar, भीष्म-ेBhishm, कर्मचारी-Karmachari, बीकानेर-Bikaner वगैरे. परंतु Meera, Kareena, Veena यांत डबल ई लिहिला नाही तर उच्चार मायरा, कारिना, विणा असे होतील, म्हणून डबल ई. त्यामुळे भीमचे स्पेलिंग Bhim करणे चुकीचे नाही, मराठीत मात्र भिम लिहिणे चुकीचे. जो माणूस प्रथमाला प्रतिमा बनवतो, तो 'भीमा'ला भिम सहज बनवू शकेल. ... (चर्चा) १२:११, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

@: आदेशात्मक मराठी व्याकरणात बसते का नाही आणि आपल्या रुचीला पटते की नाही, मुद्दाम केले असेल अथवा अनवधानाने; विशेषनामात पडले आणि सोने झाले म्हणून स्विकारणे रास्त. उद्द्या चित्रपट निर्मात्याची इच्छा असेल तर भिम एवजी भीम करेल. पण तो पर्यंत मूळ शीर्षकात आहे तसे 'भिम' हे लेखन ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
लिहिले कसेही तरी उच्चारण व्हायचे तेच होते, लिहिणाऱ्याचा मनातला आदर तोच रहातो; शेवटी भाषा वापरणारे कशी वापरायची ते ठरवतात. भाषा वापरणारे भाषा अशीच वापरणार म्हटल्यावर व्याकरण शास्त्रींनी फक्त व्यकरणाच्या पोथ्या नव्याने लिहाव्यात हे अधिक बरे.
Mahitgar (चर्चा) १३:५५, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

--- मूळ शीर्षकात भीम आहे हे मी वर सिद्ध केले आहे. यू-ट्यूबवर कुणीतरी भिम केले आहे. आणि 'लिहिले कसेही तरी उच्चारण व्हायचे तेच होते' हे मी नव्यानेच अैकले! .. (चर्चा) १४:३२, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]


ज, तुम्ही चित्रपटाचा व्हिडीओ पहा, त्यात सुरूवातीला चित्रपट-प्रमाणपत्रानंतर चित्रपटाचे नाव ही आहे, त्यातील वेलांटी पहा - तेथे "भीम ..." नसून "भिम ..." आहे. मी लेखाचा निर्माणक आहे, आणि तुम्ही जे वर भीम नावाचे संदर्भ दिलेत त्यालाच पाहून मी भीम नावाने लेख बनवला होता, परंतु जेव्हा मी चित्रपट व्हिडिओत त्याचे मूळ नाव (भिम) पाहिले, तेव्हा लेखनाव बदलले. रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) चित्रपट पहा, मुळात येथे बाबासाहेबांचे नाव "भिमराव" ऐवजी "भीमराव" हवे होते, चित्रपट निर्मात्याने तसे लिहिल्यावर लेखातही तेच वापरले आहे.
--संदेश हिवाळेचर्चा १५:२०, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

चित्रपटाचे टायटल्स बनवणाऱ्या धड मराठीही येत नाही आणि इंग्रजीही नाही. टायटल्समधल्या चुका पहा :

  • इ.व्ही रामस्वामी हा शब्द ई.व्ही. रामस्वामी असा पाहिजे.
  • दलीतांच्या हा शब्द दलितांच्या असा हवा.
  • 'म्हणुन'हे म्हणून, आणि उध्दारासाठी हे उद्धारासाठी असे लिहायला हवे.
  • Present चुकीचे, Presents हवे होते.
  • प्रतिमाच्या ऎवजी प्रथमा पाहिजे, आणि सरते शेवटी सर्वात महत्त्वाचे म्हणजे भिम नको, भीम हवे.

चित्रपट पाहूनही चित्रपटाचे पोस्टर बनवणारा, चित्रपटाचे परीक्षण लिहिणारा 'भीम' का लिहितो याचा विचार करावा. ... (चर्चा) १८:१८, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

आपणास आवडो अथवा न आवडो तथाकथीत नियमांना न स्विकारणारे असतातच की, बहुसंख्य जे बोलतात लिहु शकतात ती मराठी ! त्यांना मराठी येत नाही म्हणणारे इतर लोक कोण ?
Mahitgar (चर्चा) १८:४०, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

मराठीचा हळूहळू ऱ्हास होण्यास हीच विचारसरणी कारणीभूत आहे. इंग्रजीच्या बाबतीत असे बॊलता येईल का? कुठहेही वाचले तरी इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग चुकीचे का नसते? हिंदी विकिपीडियावर एकही चूक का नसते? संस्कृत वाङ्मयात व्याकरणाची चूक का नसते? फक्त मराठीत आणि मराठीतच अशुद्ध लेखन का खपवून घेतले जात? विचार करावा.

मराठीत उपान्त्य अक्षरातला ईकार-ऊकार दीर्घ असतो. तो जेव्हा तसा नसतो, तेव्हा तो ऑनोमोटोपोइक (ध्वन्यानुसारी) शब्द असतो. उदा०

  1. गडद गुडुम गडद गुडुम टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
  2. चिव चिव चिमऽणी गाते गाऽणी पीते पाऽणी
  3. ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक टोपी माझी दिमाखदार
  4. ढुम ढुम पट ढुम, लेझिम चाले जोरात !
  5. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळू
  6. रिम झिम पाऊस पडे सारखा

भिम हा शब्द ऑनोमोटोपोइक आहे का? ... (चर्चा) २१:०९, २० ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

.

चर्चा व्यक्तीच्या नावाची नव्हे तर निर्मात्याने चित्रपटाला दिलेल्या नावाची आहे. निर्मात्याने जरी चित्रपटाचे नाव अशुद्ध लिहिले असेल तरी नेमके तेच नाव लेखाला असणे अपेक्षित आहे.
--संदेश हिवाळेचर्चा २३:००, २१ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]