चर्चा:भारतीय जनता पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Origins[संपादन]

भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनसंघातून विभक्त झालेला पक्ष नाही.जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली.त्यानंतर जनसंघ, लोकदल आणि काँग्रेस(ओ) यांनी एकत्र येऊन १९७७ मध्ये जनता पक्षाची स्थापना केली.तेव्हा जनसंघाचे अस्तित्व लोप पावले.अर्थात बलराज मधोक यांचा जनसंघ नावाचा पक्ष आहे पण तो भारतीय जनसंघापासून निराळा आहे.बलराज मधोक यांना १९७० च्या दशकाच्या सुरवातीलाच भारतीय जनसंघातून काढून टाकण्यात आले होते.१९८० मध्ये जनता पक्षातून बाहेर पडून पूर्वाश्रमीच्या जनसंघ नेत्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा पूर्वाश्रमीचा जनसंघ पक्ष असे म्हणता येईल.पण तो काही भारतीय जनसंघातून विभक्त झालेला पक्ष नाही. ---- संभाजीराजे

Re:Origins[संपादन]

संभाजीराजे,

If you can find a reference for this, pls go ahead and change it to reflect the facts.

Regards,

अभय नातू 00:11, 10 जून 2006 (UTC)

दोन्ही केदार लेले एकच व्यक्ती असण्यास आधार कोणता ?[संपादन]

लेखातील या बदलात केदार लेले या नावासाठी आंतर्गत दुवा जोडला आहे. कदाचित या दोन व्यक्ती एकच असू शकतात पण पूरावा आहे का ? पुरावा नसेल तर पुरावा/संदर्भ मिळेपर्यंत या दोन व्यक्ती वेगळ्या असतील असे का समजू नये ? लोक्सत्तातील लेखाचे लेखक केदार लेले आणि केदार कृष्णाजी लेले या दोन व्यक्ती एकच असण्यास आधार कोणता ?

(कदाचित या केसमध्ये दोन्ही केदार लेले एकच आहे असे होईलही पण उदाहरण म्हणून अंतर्गत दुवा देणाऱ्यास खात्री नसताना अंतर्गत दुवा दिला गेला असे एखाद्या केसमध्ये घडल्ल्यास) निश्चित आधार उपलब्ध नसताना अंतर्गत दुवा दिला जाणे याने वाचकांची दिशाभूल करणारे ठरू शकणार नाही का ? वाचकांची दिशाभूल टळावी, ज्ञानकोशात होता होईतो वस्तुनिष्ठ माहिती मिळावी हा आग्रह चुकीचा असतो का ? वस्तुनिष्ठता जपली जावी अंतर्गत दुवे चुकीने दिलेजाण्याचे प्रमाणे कमी रहावे म्हणून लेख शीर्षके पूर्ण असावीत असा आग्रह धरणे चुकीचे होते का ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२४, १५ ऑक्टोबर २०१४ (IST)