Jump to content

चर्चा:भारतातील सण व उत्सव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे:,

या लेखाचे शीर्षक भारतीय सण आणि उत्सव वरुन भारतातील सार्वजनिक सुट्ट्या करण्यामागचे प्रयोजन समजले नाही.

या लेखातील दिनविशेष हे सण/उत्सवच आहेत. रथसप्तमी, दिसा जश्न, तिजरी, मेरू त्रयोदशी किंवा संत रोहिदास जयंती हे कोणत्याच राज्यात सार्वजनिक सुट्टी असल्याचे ऐकलेले नाही.

अभय नातू (चर्चा) ०१:०८, ४ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

मुळात हा लेख त्याला जोडलेल्या holidays in India या इंग्रजी लेखाचे भाषांतर दिसतो, परंतु मराठी लेखाचे शिर्षक बनवताना सुट्ट्या ऐवजी सण (व उत्सव) ठेवल्याने यात सरसगट सणांची नावे नोंदली जाऊ लागली. सार्वजनिक सुट्टया व सण हे दोन्ही ही येथे एकत्र आहेत. यीत बदल आवश्यक आहे.
बदलाही दोन पर्याय उपलब्ध आहेत:- १) हा लेख केवळ सार्वजनिक सुट्ट्यांसाठी ठेवायचा असल्यास यातील सुट्ट्या नसलेले सण वगळावे लागतील. व सणांसाठी वेगळा भारतातील सण (en: Festival in India) असा लेख करून त्यात सरसगट सण जोडावे लागतील. २) हा लेख जर पहिल्यासारखा सण व उत्सव ठेवायचा असल्यास या पानाला जोडलेले en: holidays in India हा दुवा हटवावा लागेल व त्याऐवजी याला festival in India ला जोडावे लागेल.
--संदेश हिवाळेचर्चा ०१:४९, ४ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

सार्वजनिक सुट्ट्या या बव्हंश सणाच्याच दिवशी असणार (१५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर, २६ जानेवारी हे भारतीय निधर्मी सण आहेत).

लेखातील मजकूरास प्राधान्य देउन हा लेख पुन्हा भारतीय सण व उत्सव येथे स्थानांतरित करावा आणि विकिडेटावरील आंतरविकी दुवा हटवावा.

लागल्यास भारतातील सार्वजनिक सुट्ट्या हा वेगळा लेख तयार करावा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०२:२०, ४ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

ठिक आहे, लेखशिर्षक पुर्ववत करतो व इंग्रजी दुवा हटवतो.

--संदेश हिवाळेचर्चा १८:३९, ४ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]