चर्चा:पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातील माहिती वर्गस्वरुपात जास्त उपयुक्त ठरेल.

अभय नातू (चर्चा) ०२:१५, १६ फेब्रुवारी २०१३ (IST)


वर्गस्वरूपात म्हणजे कसे करणार? कवींच्या नावांचे वर्ग करायचे की पुरस्कारांच्या नावांचे? लेखात दिलेल्या माहितीत सतत वाढ होणार. त्यामुळे दरवेळी नवीन वर्ग करावे लागणार. एखादे पान वर्गात टाकणे वेगळे आणि एखादे नाव वर्गात टाकणे वेगळे.

तक्ते करून माहिती भरता येईल. परंतु एकाच कवीला डझनभर पुरस्कार मिळू शकत असल्याने तक्त्याच्या स्तंभाची रुंदी आणि उंची त्या कवीच्या बाबतीत प्रमाणाबाहेर वाढणार. एकच पुरस्कार अनेकांना मिळत असल्यानेही तसेच होणार. तक्त्यांमधल्या स्तंभांतली माहिती अकारविल्हे किंवा कालानुक्रमे करण्यातही काही अडचणी येण्याची शक्यता आहे. एकाच कवीला ५ पुरस्कार मिळाले असतील तर त्याचे नाव सलगच्या ५ओळीत घ्यावे लागेल. शिवाय माहितीत सतत भर पडणार असल्याने तक्त्याची लांबी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाणार.

या अडचणीतून काही मार्ग निघत असल्यास उत्तम. नाहीतर तोपर्यंत आहे तीच मांडणी ठेवावी....J (चर्चा) १७:५४, १६ फेब्रुवारी २०१३ (IST)

वर्गीकरण[संपादन]

या लेखातील प्रत्येक कवीबद्दलच्या लेखात [[वर्ग:अमुक पुरस्कार विजेते]] असा वर्ग घातल्यास त्या त्या वर्गात अशा सगळ्या कवींची यादी दिसेल. त्याच बरोबर [[वर्ग:पुरस्कार विजेते मराठी कवी]] असा वर्ग करून अमुक पुरस्कार विजेते अशा प्रकारच्या सगळ्या वर्गांचा व त्यायोगे त्या कवींबद्दलच्या लेखांचा एकेठिकाणी समावेश होईल. असे वर्गीकरण आणि त्यांची hierarchy मराठी विकिपीडियावर अनेक विषयांत दिसून येईल.

एखाद्या विशिष्ट पुरस्काराबद्दलचा लेख असल्यास त्यात पुरस्काराबद्दलच्या इतर माहितीबरोबर विजेत्यांची यादी तेथे घातल्यास ती प्रयोजित वाटेल परंतु येथे केल्याप्रमाणे पुरस्कारविजेत्यांची जंत्री ही अर्धवट व अतार्किक वाटते. येथे कोणते पुरस्कार निवडले? का? याचा निकष कोणी ठरवला? या पुरस्कारांत उजवे डावे आहे का? असे अनेक प्रश्न उद्भवू शकतात.

>कवींच्या नावांचे वर्ग करायचे की पुरस्कारांच्या नावांचे?

वर्ग पुरस्कारविजेत्यांच्या नावाचे करायचे.

>लेखात दिलेल्या माहितीत सतत वाढ होणार. त्यामुळे दरवेळी नवीन वर्ग करावे लागणार.

नाही. एकदा हे वर्ग केले की प्रत्येक वेळी त्या कवीच्या लेखात पुरस्कारविजेत्यांचा वर्ग घातला (जो आपण घालणारच), तर तो लेख आपोआप योग्य त्या वर्गात दिसू लागेल.

>तक्ते करून माहिती भरता येईल. परंतु एकाच कवीला डझनभर पुरस्कार मिळू शकत असल्याने तक्त्याच्या स्तंभाची रुंदी आणि उंची त्या कवीच्या बाबतीत प्रमाणाबाहेर वाढणार. एकच पुरस्कार अनेकांना मिळत असल्यानेही तसेच होणार. तक्त्यांमधल्या स्तंभांतली माहिती अकारविल्हे किंवा कालानुक्रमे करण्यातही काही अडचणी येण्याची शक्यता आहे. एकाच कवीला ५ पुरस्कार मिळाले असतील तर त्याचे नाव सलगच्या ५ओळीत घ्यावे लागेल. शिवाय माहितीत सतत भर पडणार असल्याने तक्त्याची लांबी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाणार.

वर्गीकरण केल्यास तक्ते, अकारविल्हे लावणे, एक पुरस्कार अनेकांना, अनेक पुरस्कार एकाला, या सगळ्याचा आपोआप निकाल लागतो. आणि माहितीत भर पडल्याने वाढणारे मारुतीचे शेपूट हे स्वतःच नियोजित होत राहते.

याअधिक २०१३मधील आंतरराष्ट्रीय पुरस्कारविजेते मराठी कवी, १९९०च्या दशकातील कुसुमाग्रज पुरस्कारविजेते कवी असे अनेक प्रकारचे व अनेक प्रकारे माहितीच्या फोडी करणारे वर्ग गरज भासल्यास तयार करता येतात. याने एकाच ठिकाणची माहिती अनेक प्रकारे (आपोआप) मांडता येते.

अभय नातू (चर्चा) ०२:००, १७ फेब्रुवारी २०१३ (IST)