चर्चा:पुंथानम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अमराठी नावे मराठीत लिहिताना ती मराठीच्या शुद्धलेखनाच्या नियमांना अनुसरून लिहावी असा संकेत आहे.. उदा० लाल बहादुर शास्त्री हे नाव मराठीत लालबहादुर शास्त्री असेच लिहावे लागते. नेहरू आडनावातला शेवटचा रु मुळात र्‍हस्व असता तरी मराठीत ’अंत्याक्षर दीर्घच’ या नियमाने दीर्घ होतो.

शब्दातल्या ज्या अक्षरावर स्पष्टोच्चारित अनुस्वार असेल ते अक्षर मराठीत र्‍हस्व असते. (गायींना, चेंडूंची असल्या अनेकवचनी शब्दांना लागलेल्या प्रत्ययापूर्वीची अक्षरे अपवाद. रवींद्र, शचींद्र ही नावेही अपवाद).

चिंब, गुंड हे शब्द चींब, गूंड असे लिहिता येत नाहीत. अंजलि, प्रगति, सुमति, वालि, वासुकि, विष्णु, शंतनु ही मुळात र्‍हस्वान्त असलेली व्यक्तिनावे मराठीत अंजली, प्रगती. सुमती, वाली, वासुकी, विष्णू, शंतनू अशी दीर्घान्त लिहितात.

हिंदीतले फूँक, गूँथ, गूँज, सींग, सींच, छींक हे शब्द मराठीत आले की पुंक(र), गुंथ(णे), गुंज(णे), शिंग, सिंच(न), शिंक असे र्‍हस्वादी होतात.

विशेष नामे मराठीत लिहिताना शुद्धलेखनाचे नियम पाळणे जरुरीचे असते.. पूंथानम हे नाव मराठीत लिहिताना ते पुंथानम असेच लिहिणे बरोबर समजले जाईल..... (चर्चा) २३:२९, २१ ऑगस्ट २०१५ (IST)