चर्चा:नावजीबुवा साळुंखे-किवळकर
उल्लेखनीयता ?
[संपादन]भक्तांची संख्या फार मोठी आहे प्रत्येक भक्त इश्वराला प्रिय आहे पण विकिपीडीयात ज्ञानकोशास त्याची उल्लेखनीयता किती ? मंदिर बांधण्याबाबत ज्योतिबा लेखात उल्लेख आलाच आहे. या पलिकडे नावजीबुवा साळुंखे-किवळकर यांच्या बद्दल अधीक काही विश्वकोशिय माहिती येण्याची शक्यता कमीच. त्यांच्या नावाचा स्वतंत्र लेखाचे नेमके प्रयोजन उमगत नाही. माहितगार ०७:४४, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
- माहीतगारांच्या मुद्द्यास दुजोरा. या लेखाच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेचे समर्थन मांडावे.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:१९, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
हे बघा जिथे जोतिबा देवाचा उल्ले़ख होतो तिथे नावजीबुवा साळुंखे. या भक्ताचे नाव येनारच त्याकरीता........... Svikram69 २०:०९, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
जरा गांभीर्याने व संदर्भांसहित समर्थन मांडावे
[संपादन]ज्योतिबाच्या इतर भक्तांची माहितीही मग विकिपीडियावरील एकेका स्वतंत्र लेखात मांडावी का?
नावजीबुवांच्या लेखात विश्वकोशीय माहिती (त्यांचा जीवनकाळ), त्यांच्या ज्योतिबाभक्तिविषयी काही लिखित ऐतिहासिक संदर्भ (काही ग्रंथ वगैरे) असल्यास सांगावेत. अन्यथा या लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता नाही, असेच म्हणावे लागेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:५२, ७ ऑगस्ट २०१० (UTC)
हो इतर भक्त असतील तर जरुर ,आणि त्यांच्या ज्योतिबाभक्तिविषयी काही लिखित ऐतिहासिक संदर्भ म्हणाल तर ज्योतिबावरील "केदार विजय"नामक ग्रंथात आहे, इतर माहीती नावजीबुवांच्या लेखात विश्वकोशीय माहिती (त्यांचा जीवनकाळ)करिता वेळ लागेल.आणि आपनास ज्योतिबा विषयी कितपत माहीत आहे हे मला महीत नाही.विकिपीडीयात ज्ञानकोशास त्याची उल्लेखनीयता किती तर भविष्यात माहीती करीता...
जोतिबाच्या दक्षिणद्वारी कापूर-अगरबत्ती जेथे लावली जाते, त्या पायरीला लागून आडवी मूर्ती आणि ज्यावर भक्तिभावाने गुलाल-फुले वाहिली जातात त्या पादुका परमभक्त नावजी बुवांच्या. देवाच्या दारी पायरीजवळ अजरामर होऊन राहण्याचा मान किवळ (ता. कराड) येथील नावजी ससे (पाटील) यांना लाभला आहे. या पायरीवर दक्षिण बाजूलाच देवालयाच्या शिखरावर नावजींचा बैठ्या स्वरूपातील पुतळा आहे.
श्री ज्योतिबाचे आज जे मोठे मंदीर दिसते आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते.मूळ मंदीर कराडजवळच्या किवळ येथील नावजीबुवा साळुंखे-किवळकर नामक भक्ताने बांधले व त्याचे नंतर आजचे देवालय आहे ते इ.स.१७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मुळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले.मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडात करण्यात आले आहे.
हे संदर्भ सुधा आहेत अजून काही जास्त सांगण्याची गरज नसावी......... Svikram69 २१:४१, ७ ऑगस्ट २०१० (UTC)
- एक संदर्भ तपासून उल्लेखनीयता साचा काढून घेतला. पुरेसा मजकुर उपलब्ध न झाल्यास भविष्यात कदाचित इतर उल्लेखनीय भकतांच्या लेखात एकत्रिकरण करावे लागेल असे वाटते.