चर्चा:नागचाफा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दोन नागकेशर[संपादन]

नागकेशर या नावाच्या दोन वनस्पती आहेत. एक नागचाफा, नागचंपा किंवा नागेश्वर चंपा या नावानेही ओळखली जाणारी Musua ferrea (Synonym: Mesua nagassarium) इंग्रजीत Iron Wood, आणि दुसरी Mammea longifolia(Syn Ochrocarpus longifolius). पहिल्या वनस्पतीची फुले आणि कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात. या नागकेशरनामक झाडाचे किंवा त्याच्या फुलांतील पुंकेसराचे औषधी उपयोग असल्याचे माहीत नाही.

याउलट, Mammea longifolia (Alexandrian Laurel) या नावाच्या नागकेशराच्या सुकलेल्या कळ्यांपासून रेशीम रंगवायचे रंग करतात आणि त्याचे केसर आणि फुले रक्तस्रावासारख्या तक्रारींवरील औषधयोजनेत कामाला येतात. लेखकाने एका झाडाचे गुण दुसऱ्याला चिकटवून या दोन नागकेशरांचा गोंधळ केला आहे असे वाटते. तज्ज्ञांनी लेख वाचावा आणि खात्री करून योग्य त्या सुधारणा कराव्यात....J!


वर्ष-दोन वर्षांत कुणीही सुधारणा न केल्याने मी त्या करीत आहे......J (चर्चा) २३:१०, २४ फेब्रुवारी २०१३ (IST)


नागकेशर या नावाखाली सापडलेला मजकूर येथे हलविला. योग्य संपादने करुन लेखात समाविष्ट करावा.
अभय नातू (चर्चा) २२:०४, ७ एप्रिल २०१७ (IST)

नागकेशर

निसर्गात पन्नास-साठ फूट उंच वाढणार झाड उद्यानांत मात्र ठेंगणठुसकंच रहातं. अशी काही सुंदर ठेंगणीठुसकी डेरेदार नागकेशराची झाडं जिजामाता उद्यान आणि सागर उपवनात आहेत. नागकेशराची टोकदार भाल्याचा पात्यासारखी पाने जेव्हा नवी कोवळी असतात तेव्हा त्यांचा रंग अतिशय आकर्षक लालसर असतो. दुरूनच ही लवलवती लालसर टोक दिसून नागकेशर ओळखता येतो. जुनी झालेली पाने खालच्या बाजूने पांढरट आणि स्पर्शाला कडक असतात. नागकेशराची फुले चार पांढऱ्या पाकळ्यांची आणि असंख्य पिवळ्या केशरी पुंकेसरांनी गच्च भरलेली असतात. हे केशर म्हणजेच औषधांमध्ये मूल्यवान गणले जाणारे नागकेशर. या झाडाचे लाकूड इतके टणक असते कि त्याला इंग्रजीत आयर्नवुड म्हणतात. दमास्कसचा अरेबियन वनस्पतीशास्त्रज्ञ मेसु याच्या स्मरणार्थ या झाडाला मेसुआ हे नाव दिले गेले आहे.

संदर्भ[संपादन]

वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक