चर्चा:देशमुख
या लेखातील सुरुवातीच्या मजकूराचे विश्वकोशीय शैलीत पुनर्लेखन करावे -- अभय नातू (चर्चा) २१:२७, २५ एप्रिल २०१८ (IST)
देशमुख देशमुख हे मराठी आडनाव आहे. देशमुख हे छत्रपति शिवाजीच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत.अधिकार क्षेत्र वा परगण्याचे क्षेत्रफळाची व्याप्ती नुसार देशमुख हि पदवी वा देशमुखी हे वतन युरोपिअन घराणे-शाही तील 'ड्युक' चे समकक्ष आहे . देशमुख पदवी वा देशमुखी हे वतन कोणत्याही एका विशिष्ट धर्म वा जाती चे संदर्भात नसून ,इतिहासकालीन हिंदू व मुस्लिम राजांनी हिंदू मधील मराठा, कुटुंबाना ' देशमुखी' बहाल केल्याचे दिसून येते.देशमुख हे मराठी आडनाव देशमुखी म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी, तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी अमूक एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे, शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत. 'देशमुख ' पदवी प्राप्त कुटुंबाकडे ,अधिकार क्षेत्रा पासून महसुल प्राप्त करणे या सोबतच, अधिकार क्षेत्रात वा परगण्यात मूलभूत सेवा व सुव्यवस्था राखणे हि जबाबदारी असे .या कारणास्तव, देशमुख चा स्वैर अनुवाद ' देशभक्त ' ( loosely translated as' Patriot ') असा हि होतो व या नावा विषयी अद्याप हि समाजात आदर आहे . देशमुख हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. शिवाजीनी या देशमुखांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले. अनेक देशमुखांच्या वरचा अधिकारी तो सरदेशमुख. देशमुखांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे. याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. हे काम करणारी काही माणसे आपल्या आडनावाला देशमुख हा शब्द जोडत. ब्रिटिशांच्या राजवटीत देशमुखी संपली आणि देशमुख आणि सरदेशमुख हे शब्द फक्त आडनावांत राहिले. देशमुख आडनावाच्या काही प्रसिद्ध मराठी व्यक्ती[संपादन]
बाबालाल साहेबराव काकडे देशमुख ( सहकारमहर्षी ) गोपाळ हरी देशमुख - समाजसेवक. चिंतामणराव देशमुख - भारताचे माजी अर्थमंत्री. दुर्गाबाई देशमुख - चिंतामणराव देशमुख यांच्या पत्नी व स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या. नानाजी देशमुख - समाजसेवक. पंजाबराव देशमुख - भाऊसाहेब म्हणून प्रसिद्ध असलेले पंजाबराव शामराव देशमुख एक समाज सुधारक ,राजकारणी आणि भारतातील शेतकऱ्यांचे नेते होते . इ.स. १९३६ च्या निवडणुकी नंतर शिक्षणमंत्री, स्वतंत्र भारतात पहिल्या मंत्रिमंडळा मध्ये कृषी मंत्री . विलासराव देशमुख - राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. रितेश देशमुख - हिंदी चित्रपटांतील अभिनेता (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुखांचा पुत्र). वत्सला देशमुख - मराठी अभिनेत्या. शांताराम द्वारकानाथ देशमुख - मराठी लेखक. सदानंद देशमुख - मराठी लेखक. रंजना देशमुख - रंजना देशमुख (जन्मतारीख अज्ञात, इ.स. १९५५ - मार्च ३, इ.स. २०००; मुंबई, महाराष्ट्र) लोकप्रिय मराठी अभिनेत्री . मुगुटराव साहेबराव काकडे देशमुख, संभाजीराव काकडे देशमुख सीमा देशमुख - मराठी अभिनेत्या. सुभाष सुरेशचंद्र देशमुख - मराठी राजकारणी. स्नेहलता देशमुख - मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू
’देशमुख’ जोडलेली काही आडनावे काकडे देशमुख, कडू देशमुख, कोंडे देशमुख, चव्हाण देशमुख जगताप देशमुख, जाधव देशमुख, जेधे देशमुख, ढमाले देशमुख धुमाळ देशमुख, पासलकर देशमुख, आलम देशमुख, माने देशमुख, राजेशिर्के देशमुख, शिंदे देशमुख, शिळीमकर देशमुख, हांडे देशमुख , धायबर देशमुख पिंगळे देशमुख मोरे देशमुख .