चर्चा:टोमॅटोची कोशिंबीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख विकिपीडियासाठी योग्य आहे? नसल्यास काढून टाकावा..पाककृती जर विकीवर यायला लागल्या तर....?...J (चर्चा) २०:४५, २५ जानेवारी २०१४ (IST)[reply]

तुमचा मुद्दा विचार करण्याजोगा आहे. पण जर थालीपीठ चालते तर टोमॅटोची कोशिंबीर का चालू नये? म्हणून हा लेख कृपया काढू नये.

तसेही फ्राईड ग्रीन टोमॅटो ही पाककृती इंग्रजी विकिला वर्ज्य नाही असे दिसून येते. दुवा https://en.wikipedia.org/wiki/Fried_green_tomatoes पाककृतींसाठी आपल्या विकिचा विचार काय आहे? नियमावली अस्तित्त्वात आहे का? एकास एक न्याय आणि दुसऱ्यास वेगळा असे व्हायला नको. एकदा नियमावली आली तर हा लेख टोमॅटो या लेखात पाककृती उपविभाग म्हणून घेता येईल. या घडीला तरी जे येतील ते लेख चांगलेच असे माझे मत आहे.

  • दुसरा मुद्दा: लेखिका नवीन आहे. पहिल्याच लेखाला तडकाफडकी गाळणी लागली तर ती कशाला येथे राहील? थोडे थांबा! लेख कसे लिहिले तर विकिसाठी योग्य राहतील, याचे मार्गदर्शन करू या. थोडे लिखाणाला प्रोत्साहनपर लिहू या. मग काही दिवसांनी कदाचित त्याच टोमॅटो या लेखात पाककृती उपविभाग म्हणून घेतील. तसे त्यांना सुचवता येईलच. निनाद ०३:१२, २६ जानेवारी २०१४ (IST)[reply]
पाककृती या मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पाच्या कक्षेत येतात. त्या सावकाशिने तिकडे स्थानांतरीत करता याव्यात म्हणून तसे वर्गीकरण करावे.धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४२, २६ जानेवारी २०१४ (IST)[reply]