चर्चा:टोकरे कोळी
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]आदिवासी टोकरे कोळी किंवा ढोर कोळी समाज हा खास करून पालघर ,धुळे, नाशिक ,नंदुरबार व जळगाव जिल्यात यांचे प्रामुख्याने वास्तव आहे. टोकरे कोळी जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून धुळे ,नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात. या समाजातील लोक यांचे पूर्वज आधी ढोरांचे मांस खात असत म्हणून याना ढोर कोळी असे देखील म्हणतात. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांत हा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता दिसून येते.
- देवदेवता
टोकरे कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. आडनावा मध्ये चव्हाण , सोनवणे , साळुंखे , शिरसाठ , बागुल , नवसारे , आखाडमल इ . आढळून येतात हिरवा देव , कनसरी माता , वाघ्यादेव(वाघोबा), हिरवा, काळोबा,वरसुआई, इत्यादी देव मानतात. सात, घट बसवणे,मोडा पाळणे,वाघ बारस, आखाजी ( अक्षय तुतीया ) , होळी वगैरे सण पाळतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असला तरी शिकलेली पिढी यावर आता विश्वास करत नाही. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात त्यांच्या बुवाबाजीत सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे.
- रूढी व परंपरा
समाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. घाटा (गव्हापासून बनवलेला गोड शिरा )बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला सती देवी पूजा करतात. जमलेल्या आप्तेष्टांत पाच भाकऱ्या व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून कुळदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात. समाजात मृताला जाळतात किंवा काही भागात पुरतात. लग्न गोत्र पाहून होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात.
या समाजामध्ये बालविवाह प्रचलित नव्हता, आताही होत नाहीत. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. आदिवासी कोळ्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.
- उपजीविका व व्यवसाय
टोकरे कोळी समाजातील लोकांचा व्यवसाय शेती असतो. आधीच्या काळी अस्पुश्य समान दर्जा असल्याने गुरं-ढोर याचे मांस हा समाज खात होता. पण आता आधुनिक जीवन शैली मुळे राहणीमान मध्ये फरक दिसून येतो शेती ही प्रामुख्याने केली जाते ,शेतामध्ये गहू ,बाजरा , हरभरा , कापूस , ज्वारी यांचं पीक घेतले जाते. अशिक्षित यांचं प्रमाण मोठं असल्याने अनेक तरुण बेरोजगार पाहावयास मिळतात. कामधंदा निमित्ताने अनेक तरुण शेजारील गुजरात राज्यातील सुरत, बारडोली ,बडोदा ,नवसारी , भरूच इत्यादी ठिकाणी कामास आहेत. अनामिक सदस्य 43.242.226.9 संतोष गोरे ( 💬 ) १०:१६, ९ ऑगस्ट २०२३ (IST)