टोकरे कोळी
Jump to navigation
Jump to search
आदिवासी टोकरे कोळी (ढोर कोळी) समाज हा विशेष करून धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक इत्यादी तसेच राज्याच्या इतर भागात आढळून येतो.ही जमाती आदिवासी वर्गात कनिष्ठ मानली जाते.टोकरे कोळी जमातीलाच ढोर कोळी नावाने सुद्दा ओळखले जाते.
इतिहास :-
ब्रिटिश काळात टोकरे कोळी (ढोर कोळी) समाजाला हलके गावकामगार म्हणून मान्यता होती, तसेच ढोरांचे मांस खाणे,टोकर तोडणे, हाडे गोळा करणे इत्यादी स्वरूपाची कामे करत.टोकर तोडणे च्या कामामुळे त्यांना टोकरे कोळी म्हणू लागले.ही जमाती भिल्ल जमातीशी साधर्म्य दाखवते.
वसतिस्थान :-
टोकरे कोळी जमातीचे प्रामुख्याने धुळे,नंदुरबार, जळगाव,नाशिक,बुलढाणा,औरंगाबाद व राज्याच्या इतर भागात वास्तव्य आहे.
देव-देवता :-
टोकरे कोळी बांधव कणसरी माता,हिरवादेव ,चिडया देव,भवानी इत्यादी देवी-दैवत ची पूजा करतात.