चर्चा:जेम्स मनरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मन्रो असा उच्चार[संपादन]

या आडनावाचा उच्चार 'मनरो' असा नसून 'मन्रो' असा आहे ('न आणि र' यांचे जोडाक्षर). कृपया नवे स्थानांतरण दुरुस्त करावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४८, २० जून २०११ (UTC)


मराठी शब्दांत(संस्कृत नव्हे!) शब्दातले तिसरे अक्षर अकारान्त नसेल, पण दुसरे असेल तर त्याचा उच्चार हलन्त होतो. त्यासाठी त्याचा पाय मोडायची गरज नसते. उदा० भटका(उच्चार भट्‌का); मटकी(उच्चार मट्‌की); कापरे(उच्चार काप्रे); चादरी(उच्चार चाद्री); घाबरो मत(उच्चार घाब्रो मत्‌) इ.इ. त्या नियमानुसार मन्रो हा शब्द मराठीत मनरो असा लिहिला तरी उच्चार मन्रो असाच होतो. मेरिलिन मनरो मराठीत कधीही मन्रो नव्हती

शब्द तीन अक्षरांपेक्षा मोठा असेल तर आणखी वेगळे नियम आहेत. ....J १६:३८, २० जून २०११ (UTC)


माझ्या मते, मनरो पेक्षा मन्‍रो योग्य होईल. जसे Henry = हेन्‍री.
Jस असे तुम्ही जे नियम सांगितलेत ते पटण्याजोगे असले तरी जुन्या काही पुस्तकांत - काही ब्रिटीश कालीन - henry सारख्या शब्दांसाठी हेन्‍री असे लेखन केले जात होते. तोच नियम वापरण्यास हरकत नाही. दुसरी बाब म्हणजे आज काल व्याकरणाचे नियम सुद्धा सामान्य माणसास उत्तमरीत्या माहीत नाहीत (अर्थात त्याची कारणे खूपच वेगळी आहेत, पण त्यावर खल नको.) आणि जे काही प्राथमिक ज्ञान असते ते नेहमीच्या बोलण्यातून त्याला सवयीचे झालेले असते, जसे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे भटका(उच्चार भट्‌का); मटकी(उच्चार मट्‌की); कापरे(उच्चार काप्रे); चादरी(उच्चार चाद्री) इ.इ. परंतु हाच माणूस मनरो ला मन्‍रो म्हणेलच ह्याची खात्री नाही. त्यातून मी अशी काही माणसे पाहिलीत की ती लेखनानुसारच उच्चार करतात, म्हणजे त्यांना तसेच शिकवीलेले असते. अशावेळी गोंधळ होण्याची शक्यता आहे.......
अनिरुद्ध परांजपे १७:०१, २० जून २०११ (UTC)

स्थानिक उच्चार[संपादन]

जो माणूस चादरीचा उच्चार चा-द-री करेल तोच मनरोचा उच्चार मनऽरो करेल. अशी माणसे किती असतील? आणि त्यांनी तसा उच्चार केला तर काय बिघडते. हिंदीत तर उप्‌राष्ट्रपती, इंद्रा गांधी, अप्‌घात असे उच्चार होतात, त्यासाठी उप्राष्ट्रपती, अप्घात वगैरे लिहावे लागत नाही. उच्चारानुसारी लेखन ही मुळातच वेडगळ कल्पना आहे. खरे तर लेखनानुसार उच्चारण हवे, अर्थात स्थानिक उच्चारांची प्रथा विचारात घेऊन. स्थानिक उच्चारानुसारी लेखन करायचे म्हटले तर पुणे या पानाचा मथळा बदलून पुणऽ असा आणि मुंबई बदलून म्हमई(स्थानिक बहुजनांचा उच्चार) करायला पाहिजे.

"a fortiori" हा शब्द वेगवेगळ्या १३२ प्रकारे उच्चारता येतो असे वेबस्टरचा कोश(Webster's Third New International Dictionary--1961) म्हणतो. ....J १७:३२, २० जून २०११ (UTC)


a fortiori[संपादन]

उघडा आणि पहा:- http://www.google.co.in/search?q=a+fortiori+132s+pronunciation&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:en-US:official&client=firefox-a ...J १७:५१, २० जून २०११ (UTC)


संस्कृत--एकमेव उच्चारानुसार लेखन असणारी भाषा[संपादन]

संस्कृत ही उच्चारानुसारी लेखन आणि लेखनानुसारी उच्चारण असणारी जगातली एकमेव असणारी भाषा असावी. लिहायचे मिनेसोटा आणि उच्चारायचे मिनिसोटा हे रोमन लिपीत लिहायच्या इंग्रजी भाषेचे वैशिष्ट्य आहे. तोच प्रकार यूटा(लिखाण युटा), अर्कन्सास(लिखाण आर्कान्सा) वगैरे नावांचा....J ०५:०७, २१ जून २०११ (UTC)


माझे मत[संपादन]

ह्यासंदर्भात काही guidelines असाव्यात.....
आणि विशेषनामांस मराठी शुद्धलेखनाचे नियम लावू नयेत.... J, आपणच मध्ये म्हणाला होतात की cartesian स कार्टेशी म्हणणे अयोग्य/विकृत ठरेल. कार्टेशियन हा मूळ उच्चार-लेखन योग्य ठरेल म्हणून. माझ्या :मते एकतर पर्यायी शब्द वापरावा अथवा मूळ उच्चारांनुसार लेखन करावे. (आणि व्यक्तीनाम, स्थळनाम आदींसाठी मूळ उच्चारांनुसार लेखन करावे).
>>"खरे तर लेखनानुसार उच्चारण हवे"
उ. म्हणूनच मन्‍रो असे लिहावे असे माझे मत आहे... नाहीतर लोक म-न-रो असे म्हणू लागतील....
अनिरुद्ध परांजपे १६:२३, २१ जून २०११ (UTC)


२+२[संपादन]

उच्चारानुसारी लेखन ही मुळातच वेडगळ कल्पना आहे....संस्कृत ही उच्चारानुसारी लेखन आणि लेखनानुसारी उच्चारण असणारी जगातली एकमेव असणारी भाषा असावी.

संस्कृत वेडगळांची भाषा आहे. २+२=५!

असो. उच्चारानुसार लेखन कि लेखनानुसार उच्चार हा वाद म्हणजे कोंबडी आधी कि अंडे या काथ्याकूटीसारखा आहे. लेखन केलेले बोलले जाते कि ऐकलेले लिहिले जाते?

अभय नातू १६:३९, २१ जून २०११ (UTC)


>>लेखन केलेले बोलले जाते कि ऐकलेले लिहिले जाते?
ह्यावर काथ्याकूट करूच नये... ह्याबाबतीत सीमारेषा अंधुक असतानाच, असा एखादा प्रसंग आल्यास लोकांची मते घ्यावीत आणि सर्वानुमते योग्य तो निर्णय वापरावा.. अर्थात कधीकधी ह्यात चूकीचे निर्णय घेतले जाउ शकते, तरीही चांगल्या बरोबर वाईटही येते हे लक्षात ठेवून ह्या उपायाचा अवलंब करण्यास हरकत नाही.....
अनिरुद्ध परांजपे १७:०४, २१ जून २०११ (UTC)

सीमारेषा पुसट नाहीत[संपादन]

भाषा जेव्हा जन्माला येते तेव्हा उच्चारानुसारी लेखन होत असते. भाषा स्थिरावली आणि तिच्यात मुबलक लेखन झाले की ते लेखन प्रमाण मानून उच्चार निश्चित होतात. उच्चारांत देशपरत्वे आणि कालपरत्वे थोडेफार बदल होतात, पण त्यांतले फारच कमी बदल प्रत्यक्ष लिखाणात उतरतात. त्यामुळे उच्चारानुसारी लेखन की त्याउलट, यांतील सीमारेषा धूसर नाहीत, तर अगदी स्पष्ट आहेत. ऐकलेलेच लिहिले जात असते तर इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग गांवोगांवी बदलले असते. इंग्रजीत ज्याला स्पेलिंग म्हणतात त्याला मराठीत शुद्धलेखन म्हणतात, आणि स्पेलिंग अचूक असण्यावर आपण जितका भर देतो तितकाच, किंवा काकणभर जास्त भर शुद्धलेखनावर दिला गेला पाहिजे. ललित किंवा संवादी नसलेले गंभीर विषयावरील लिखाण प्रमाणभाषेत असायला पाहिजे, ते बोलीभाषेत केले तर बारा कोसावर समजणार नाही.

लोकांच्या बहुमतांवर भाषेची शुद्धता ठरवता येत नाही. शुद्ध बोलणारी आणि लिहिणारी माणसे कोणत्याही देशात निरपवादपणे अत्यल्पच असतात. अडाण्यांचे बहुमत म्हणजे भाषेचा र्‍हास.

अडाण्यांचे बहुमत[संपादन]

J,

आपले इतर मतभेद असले तरी अडाण्यांचे बहुमत म्हणजे भाषेचा र्‍हास या बाबत अगदी एकमत. यात भाषा ऐवजी अनेक शब्द योजता येतील. परवा (विनोदात) बातमी प्रसारित झाली होती की अलाबामातील जनतेने सार्वमत घेउन पाय(π)ची किंमत बदलून ३ करुन टाकली आहे.....

अभय नातू १९:००, २१ जून २०११ (UTC)

विशेषनामांचे शुद्धलेखन[संपादन]

>>विशेषनामांस मराठी शुद्धलेखनाचे नियम लावू नयेत.<< संस्कृतमधला नीलकंठ मराठीत लिहिताना निळकंठ होतो. सीताराम हिंदीत सियाराम होतो. चेन्नै, दोसै, कोच्चि हे शब्द अनुक्रमे चेन्नई, डोसा, कोचीन असे होतात, कारण मराठीत ऐकारान्त आणि च्चिकारान्त शब्द नाहीत. असते तर ते विभक्तीनुरूप कसे चालवायचे याचे व्याकरण नसल्याने शक्य झाले नसते. इंग्रजीतले लन्डन्‌, हिंदीत लन्दन आणि मराठीत लंडन होते. तामीळमधल्या र्‍हस्व एकार-ओकार यांचे उच्चार अनुक्रमे य आणि व सारखे ऐकू येतात. ते उच्चारानुरूप लिहायचे झाले तर ऎऐवजी य आणि ऒऐवजी व लिहावा लागतो. दोन र आहेत, त्यातला ऱ हा र्र सारखा ऐकू येतो. नगरचा उच्चार नहर होतो. मराठी ष हा उच्चार करताना ताळूला जिथे जीभ लागते तिथे ती लावून र असा उच्चार करण्याचा प्रयत्न केला की तामीळ ऴ चा उच्चार होतो. हे उच्चार असणारी विशेष नामेही असतात, त्यांचे मराठीकरण केल्याखेरीज लिहिणे कसे शक्य आहे? विशेषनामांची स्वभाषेत रूपांतरे करणे ही अत्यंत साहजिक क्रिया आहे. प्रत्येक भाषेत हे घडते, मराठीने उगीच अपवाद बनायचा प्रयत्न करू नये...J १९:३२, २१ जून २०११ (UTC)