चर्चा:जुनिचिरो कोइझुमी
या लेखातील जपानी बौद्ध हा वर्ग मी काढला आहे. कोइझुमी यांनी तोक्योमधील यासुकुनी देवळाला भेट देउन तेथे धार्मिक विधी करुन पुनःपवित्रता घेतल्याचा उल्लेख[१] आहे. यासुकुनी देउळ हे बौद्ध धर्माचे देउळ नसून शिंतो धर्माचे आहे[२]
यावरुन कोइझुमी बौद्ध धर्मीय नाहीत हे सिद्ध होते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]
@संदेश हिवाळे:,
तुम्ही बौद्ध धर्मीय व्यक्तींचा वर्ग घालताना एखाद्या वर्गातील सगळ्या लेखांमध्ये सरसकट न घालता कृपया ती व्यक्ती नक्की बौद्ध आहे ना याची खात्री करुन घेउन मगच वर्गीकरण करावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:३९, ८ ऑगस्ट २०१७ (IST)
मी बौद्ध धर्मीय व्यक्तींचा वर्ग सरसगट घातलेला नाही, इंग्रजी विकिनुसारच मी तो वापरालाय. Japanese Buddhists हा वर्ग लेखाला आहे.
आणि एखादा व्यक्ती शिंतो धर्मीय असला तरीही तो बौद्ध धर्मीय असू शकतो. कारण जपान मध्ये बौद्ध व शिंतो या दोन्ही धर्मांना एकत्रितपणे मानणाऱ्यांचे प्रमाण ८०-८५% असावे. म्हणजेच एका व्यक्तीचे दोन धर्मही असू शकतात.
Shinzo Abe हे ही पहा, याखेरीज तुम्हाला अनेक लेखात Japanese Shintoists व Japanese Buddhists हे दोन वर्ग एकत्र दिसतील. म्हणून कोइझुमी हे बुद्धिस्ट सुद्धा आहेत, असं म्हणावसं वाटतं.
--संदेश हिवाळेचर्चा ०१:३३, ८ ऑगस्ट २०१७ (IST)
- संदेश हिवाळे यांच्या वरील स्पष्टीकरणात पुरावे नसले तरीही त्यातील तर्क ग्राह्य आहे.
- जपानी बौद्ध हा वर्ग परत घातला.
- अभय नातू (चर्चा) ०१:५२, ८ ऑगस्ट २०१७ (IST)