चर्चा:जनार्दन केशव म्हात्रे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया माहिती पडताळून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासंबंधी सूचना कराव्यात, ही विनंती.

संपादित माहिती विषयी पुढील संदेश देण्यात आला. याचे कारण काय असावे... माहिती मिळू शकल्यास त्रुटी काढून टाकता येतील.

>>> Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल. <<<

आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासंबंधी सूचना देऊन सदर माहिती नियमित करावी, ही' विनंती...

माहिती[संपादन]

  • मला वाटते येथील प्रतिसादातील चर्चा] अभ्यासण्याचा म्हात्रे साहेबांना योग आला असावा. अनवधानाने तेथील माझा प्रतिसाद वाचणे राहीले असेल तर पुन्हा एकदा पहावा ही नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२८, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

संदर्भ पडताळता आले पाहीजेत[संपादन]

@103.74.237.41: लेखात फेसबुकचे संदर्भ कितपत चालू शकेल हे नंतर ठरवूयात प्रथमत: तो दुवा उघडत नाही असे निदर्शनास आले.

माफ करा, ही माहिती सध्या उपलब्ध नाही
The link you followed may have expired, or the page may only be visible to an audience you're not in.

असा संदेश येतो आहे संदर्भ पडताळता आला नाही.

@Mahitgar: माहिती घेत असताना व विकिपिडीयावर देत असताना आमच्याकडून चूक झाली असावी. नव्याने दिली आहे कृपया पुन:पडताळणी करावी. तसेच २००५ व २००६ सालचे कोणतेही दुवे आंतरजालावर उपलब्ध नसल्यामुळे ते देण्यास असमर्थता येत आहे. विकिपीडियाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास आपण तो विभाग नियमानुसार संपादित करू शकता किंवा वगळू शकता.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०९, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


तुम्ही फेसबुक वर दिलेला दुवा स्मरण चिन्हाचे चित्र दाखवतो ते केवळ सहभागासाठी आहे का पुरस्कार आहे हे निश्चित करणे अवघड जाते, अशी माहितीची खात्री करणे पहिली जबाबदारी इतर माध्यमातील लेखक आणि पत्रकारांची असते. लेखक/पत्रकारांनी व्यक्ती प्रसंग घटना विषय यांची आधी माहिती घ्यावी दुजोरा घेऊन मग इतर माध्यमात लिहावी त्या नंतर माहिती इतर माध्यमातील संदर्भासहीत ज्ञानकोशात यावी असा शिरस्ता अपेक्षीत असतो पण मराठी भाषेच्या बाबतीत इतर माध्यमे कमी पडतात म्हणून अशा समस्या उद्भवतात.
तुम्ही दिलेला दुवा प्रथम संदर्भ म्हणून ठिक आहे. पण दुजोरा हवा साचा राहू द्यावा म्हणजे (इतर) माध्यम प्रतिनिधींचे त्याकडे लक्ष गेल्यास किंवा जाणत्या विकिपीडियनला इतर माध्यमातून खात्री करता असल्यास बरे पडते. माहितीस दुजोरा हवा आहे असे आवाहन मिसळपाव संस्थळावरील लेखाच्या माध्यमातून केलेले आहे.
मला ज्ञानेश वाकुडकर नावाच्या कवि महोदयांबद्दल लेख पूर्ण करावयाचा आहे पण माध्यमांमध्ये त्यांच्या माहिती बद्दल कमतरता आहे, म्हणून त्यांची इमेलने मुलाखत घ्यावी ती मिसळपाव ऐसी अक्षरे सारख्या संस्थळांवर टाकावी आणि त्या नंतर काळाच्या ओघात माहिती मराठी विकिपीडियावर घ्यावी असा विचार करतो आहे. व्यक्तींबद्दल आत्मीयता असते पण ज्ञानकोशीय संकेतांच्या पालनाकडे सुद्धा लक्ष देणे श्रेयस्कर ठरते. असो.
चर्चापानावर चर्चेत सहभागासाठी आभार आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२१, १५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]