चर्चा:चिंचवणे
इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात हलवावा -अभय नातू (चर्चा) ११:३१, ५ एप्रिल २०२० (IST)
##चिंचवणे##
नकाशा व त्यातील स्थान चिंचवणे गावाचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशातील स्थान.
राज्य - महाराष्ट्र, जिल्हा - अहमदनगर, जिल्हाउप-विभाग - संगमनेर, मुख्यालय - अकोले, लोकसंख्या - १२६४, लोकसभा मतदारसंघ - शिर्डी, विधानसभा मतदारसंघ - आकोले, टपाल संकेतांक - ४२२६०४, वाहन संकेतांक - एम एच १७.
चिंचवणे (गाव) फोटो
चिंचवणे हे गाव महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये आहे. चिंचवणे हे गाव हरिश्चंद्रगडाच्या जवळपास म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे गावात सुंदरसे मारुती मंदिर तसेच वेताळेश्वर मंदिर आहे. गावचे ग्रामदैवत मुक्ताई या देवीची तसेच वेताळेश्वराची दरवर्षी यात्रा असते चिंचवने या गावात वेगवेगळ्या जातीची जमातींचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या या गावात अनेक आडनावांची लोक राहतात जसे की बांडे, कोकणे, डगळे, आढारी, चावडे ,सोनवणे ई. तसेच गावात अनेक वाड्या-वस्त्या आहेत जसे की पाटीलवाडी,बांडेवाडी,वेताळवाडी,आवळवाडी, नागवाडी,कोंबडवाडी,अशा वाड्या मिळून चिंचवणे गाव बनते.गावात ग्रामपंचायत आहे तसेच गावांमध्ये मारुतीची तसेच विठ्ठल रुक्माई चे मंदिर आहे सालाबाद प्रमाणे दरवर्षी गावात सात दिवसाचा सप्ताह असतो व त्या सप्त्याला गावातील लोक आवर्जून उपस्थित राहतात.या सप्त्याच्या दिवसात म्हणजेच ते सात दिवस स्नेहभोजन असते व कीर्तनही असते. गावामध्ये पोस्ट ऑफिस ही आहे.
## प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा तसेच वसतिगृह ##
चिंचवणे या गावामध्ये जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. तसेच आठवी ते दहावी माध्यमिक हायस्कूल आहे.पुढील शिक्षणासाठी चिंचवणे गावातील मुले जवळील राजुर येथे महाविद्यालयात प्रवेश घेतात तसेच गावांमध्ये वसतिगृहाची ही सुविधा आहे. वसतिगृहाची सुविधा असल्या कारणामुळे जवळपासच्या अनेक गावांमधील मुले चिंचवणे गावामध्ये शिकण्यासाठी येतात. तसेच वाड्या-वस्त्या वरती प्राथमिक म्हणजेच पहिली ते चौथी वस्तीशाळा आहेत.
## चिंचवणे गावाला कसे पोहोचाल? ##
चिंचवणे गावाच्या उत्तरेस राजूर ही एक मोठी बाजारपेठ आहे. तसेच पूर्वेस अंबड आणि पाडाळणे अशी गाव आहेत.तसेच दक्षिणेत शेलद, मेचकरवडी आणि पश्चिमेस सकिरवाडी,बांगरवाडी अशी गाव आहेत. तसेच अकोले आणि राजूर या गावां तून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस चिंचवणे गावात येतात.
चिंचवणे हे गाव अकोले पासून १६ किलोमीटर तसेच राजूर पासून ६.७ किलोमीटर असे दोन जवळचे महत्त्वाच्या शहरांपासून जाण्यास बसेस मिळतात.चिंचवणे हे गाव अहमदनगर जिल्ह्या पासून १६४ किलोमीटर तसेच महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून १५७ किलोमीटर आहे. चिंचवणे गावाच्या जवळीक शहरे म्हणजे ३७ किलोमीटर वर सिन्नर तर ४४ किलोमीटरवर जुन्नर तसेच २३ किलोमीटरवर संगमनेर तर ६१ किलोमीटर शिर्डी अशी शहरे आहेत. गावाकडे जाण्यासाठी हे सर्व मार्ग आहेत. ह्या गावाकडे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचे शहर म्हणजे राजुर होय चिंचवणे गावच्या पूर्वेकडून राजूर ते पुणे असा एक मार्ग आहे.
## चिंचवणे गावातील महत्त्वाची पिके ##
चिंचवणे या गावामध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे तसेच रब्बी हंगाम मध्ये सोयाबीन,भात, बाजरी, ज्वारी असे महत्त्वाचे पिके निघतात. व दुसऱ्या हंगामामध्ये हरभरा, वाटाणा,गहू, शेळू व कांदा असे महत्त्वाचे पिके निघतात .
## गावाकडील प्रमुख आकर्षण ## फोटो
चिंचवणे गावामधील सर्वात आकर्षण म्हणजे या छोट्याशा गावामध्ये वेताळेश्वराची धुळीच्या पाडव्याच्या दिवशी मोठी यात्रा भरते.यादिवशी कामानिमित्त गावाबाहेर गेलेले सर्व लोक या दिवशी हजर होतात आणि सकाळी कार्यक्रमाला सुरुवात होते पहिल्यांदा लेझीमचा कार्यक्रम होतो. नंतर परंपरेप्रमाणे १५० ते १६० किलो चा दगडाचा एक गोल गोटी खांद्यावर घेऊन वाजत गाजत मंदिराला व होळीला फेऱ्या मारतात. त्यानंतर काठीचा कार्यक्रम असतो एक प्रचंड साग या झाडाची मोठी काठी काढलेली असते तिची मिरवणूक निघते व परंपरेप्रमाणे या दिवशी म्हणजे मोठी माणसे असो किंवा लहान मुलगा कोणी या दिवशी म्हणजे कार्यक्रमाच्यावेळी पायामध्ये चप्पल घालत नाहीत.
तसेच या गावांमधून दोन ओढे वाहत जातात व त्या ओढ्यांवर दोन मोठे पाझर तलाव या नावाचे तळे आहेत.हे ओढे मुळा या मोठ्या नदीच जाऊन मिळतात.
# चिंचवणे गावातील विविध जाती जमाती #
चिंचवणे गावामध्ये जास्तीत जास्त आदिवासी समाजाचे लोक राहतात तसेच या गावांमध्ये महार आणि लोहार समाज तसेच कानडी समाज ही राहतो.
## चिंचवणे गावात जवळीक पर्यटन स्थळे ##
अकोले तालुक्यातील प्रमुख नद्या म्हणजे मुळा व प्रवरा ह्या दोन नद्या चिंचवणे गावापासून म्हणजेच मुळा १२ कि मी व प्रवारा ७.९ कि मी अंतरावर आहेत,तसेच अकोले तालुक्यातील सह्याद्री रांगेतील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणजे हरिश्चंद्रगड हे २८ कि मी अंतरावर आहे व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे ३१ कि मी अंतरावर आहे. तसेच भंडारदरा धरण २४ कि मी अंतरावर तर रतनगड हे ठिकाण ३९ कि मी अंतरावर आहे,तसेच रंधा धबधबा हे अकोले तालुक्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ मानले जाते ते चिंचवणे गावापासून १७ किलोमीटर अंतरावर आहेत तर शिर्डी देवस्थान हे ६१ कि मी अंतरावर आहे.
# चिंचवणे गावात बद्दल आणखी काही #
अकोले तालुक्यातील सहकारी साखर कारखाना हा चिंचवणे गावापासून 16 कि मी अंतरावरती आहे. चिंचवणे हे गाव अकोले पंचायत समिती अंतर्गत येते,तसेच जिल्हा परिषद अहमदनगर याचाही अंतर्गत आहे. श्रावण महिन्यातील येणारा सण म्हणजे परंपरागत चालत आलेला बैल पोळा हा सण गावामध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो. या गावांमध्ये मंगळवार हा दिवस मोडा म्हणून पाळला जातो त्यादिवशी कोणताही शेतकरी कितीही महत्त्वाचं काम असलं तरीही बैलांचे औउत धरत नाही जसे की नांगर,कुळव इत्यादी. तसेच जागतिक आदिवासी दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारखे उत्सवही गावात गावात मोठ्या उत्साहाने केले साजरे केले जातात.